सिडकोतील घरफ ोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: May 25, 2014 23:07 IST2014-05-25T23:07:22+5:302014-05-25T23:07:22+5:30

गणेश चौकातील घटना : विवाह समारंभासाठी जाणे पडले महाग

CIDCO's home loan is worth 2.5 lakhs | सिडकोतील घरफ ोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

सिडकोतील घरफ ोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

ेश चौकातील घटना : विवाह समारंभासाठी जाणे पडले महाग
सिडको : विवाह समारंभासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सिडकोतील गणेश चौकात शनिवारी मध्यरात्री घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे़
सिडकोतील गणेश चौकात राहणारे दिलीप लहाणे हे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी कुटुंबासह गेले होते.विवाह समारंभ आटोपल्यानंतर ते चेतनानगर येथील भावाकडे मुक्कामास थांबले़ परंतु त्यापूर्वी वडील काशीनाथ लहाणे यांना त्यांनी घरी सोडले़ उन्हाळ्याचे दिवस असल्याने काशीनाथ लहाणे घराचा दरवाजा न उघडता गच्चीवर झोपले़ मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे दोन किलो चांदी, सोन्याचे दागिने व ५५ हजार रुपयांची रोकड असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला़ या प्रकरणी दिलीप लहाणे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात घरफ ोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

--कोट--
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी
गणेश चौक भागात दिलीप लहाणे यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास झाल्याने घरफ ोडी करणार्‍या गुन्हेगारांची त्वरित सर्च मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची झडतीही घेतली, मात्र अद्यापपर्यंत चोरी गेलेला ऐवज मिळून आलेला नाही़ गुन्हेगारांचा लवकरच शोध घेतला जाईल़
- के. के.मतकर, पोलीस उपनिरीक्षक, अंबड

Web Title: CIDCO's home loan is worth 2.5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.