सिडकोत ड्रनेेजचा बोजवारा; तक्रारींमध्ये वाढ

By Admin | Updated: July 27, 2015 21:19 IST2015-07-27T21:19:12+5:302015-07-27T21:19:12+5:30

सिडको : ड्रेनेज चोकअप होणे, घरात ड्रेनजचे पाणी साचणे, शौचालयातून ड्रेनेजचे पाणी बाहेर येणे अशा प्रकारच्या तक्रारींनी सिडकोवासीय हैराण झाले असून, यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशी परिस्थिती असतानाही मनपा सिडको विभाग सुस्तावलेलाच दिसत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यानींही कानावर हात ठेवल्याने सिडकोवासींयामध्ये तीव्र संतापाची लाट पसरल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Cidcoat drownage; Increase in complaints | सिडकोत ड्रनेेजचा बोजवारा; तक्रारींमध्ये वाढ

सिडकोत ड्रनेेजचा बोजवारा; तक्रारींमध्ये वाढ

डको : ड्रेनेज चोकअप होणे, घरात ड्रेनजचे पाणी साचणे, शौचालयातून ड्रेनेजचे पाणी बाहेर येणे अशा प्रकारच्या तक्रारींनी सिडकोवासीय हैराण झाले असून, यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशी परिस्थिती असतानाही मनपा सिडको विभाग सुस्तावलेलाच दिसत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यानींही कानावर हात ठेवल्याने सिडकोवासींयामध्ये तीव्र संतापाची लाट पसरल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिडको भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, त्या बदल्यात मात्र मनपाकडून सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. सिडको भागात सद्यस्थितीत ११ प्रभाग मिळून नऊ कर्मचारी हे चोकअप काढणार्‍याच्या कामासाठी आहे. ११ प्रभागात मिळून २२ नगरसेवक आहेत. प्रत्येक प्रभागात तीन मिळून ३३ कर्मचारी असणे गरजेचे आहे; परंतु वरिष्ठ अधिकार्‍याच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे सिडको भागातील ड्रेनेज समस्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पूर्वी मनपा कर्मचार्‍याबरोबरच मक्तेदारांकडूनही कामे तातडीने मार्गी लावण्यात येत होती; परंतु गेल्या काही महिन्यांपासून मक्तेदारांकडील कामेही बंदच असल्याने चोकअप काढण्याची सर्व जबाबदारी मनपाकडील तुटपुंजा कर्मचार्‍यांवर आल्याने चोकअप काढणार्‍याचे कामे पूर्ण होत नाही.
सिडको प्रभागातून दररोज ४० ते ५० असतात त्यातील अनेक तक्रारी या प्रलंबित राहतात. त्यात दुसर्‍या दिवशी परत वाढ होते. सिडकोतील दत्त चौक, मोरवाडी, सिंहस्थनगर, भगतसिंग चौक, पाटीलनगर, जुने सिडको, तुळजाभवानी चौक, झोपडप˜ी वसाहत क्रमांक १ व २ यांसह सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज चोकअपच्या तक्रारी दररोज येत असतात; परंतु त्याचे निराकरण होत नसल्याने सिडकोवासीय हैराण झाले आहे. मनपाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत लक्ष घालून सिडकोचा ड्रेनेज चोकअपचा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

इन्फो
प्रभाग क्रमांक ४४ मध्ये नगरसेवक म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करीत आहे. सर्व प्रथम नागरिकांना भेडसावणार्‍या मूलभूत समस्या सोडविण्यास प्राधान्य देते. प्रभागातील ड्रेनेज चोकअपचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, याबाबत सतत मी मनपाकडे पाठपुरावा करीत असते, परंतु मनपाकडे कर्मचारी संख्या कमी असल्याने संपूर्ण तक्रारींचे निरसन होत नाही. पूर्वी मनपा मक्तेदारामार्फत कामे करीत होती; परंतु सध्या ही कामे होत नसल्याने दिवसेंदिवस तक्रारीत वाढच होत आहे. याबाबत मनपाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
शीतल भामरे, नगरसेवक प्रभाग-४४

Web Title: Cidcoat drownage; Increase in complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.