शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या 'निवडणूक रोखे' योजनेचा घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 07:11 IST

निवडणूक प्रक्रियेत काय घडते, हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.

२०१७ - वित्त विधेयकाच्या माध्यमातून निवडणूक रोखे योजना मांडण्यात आली.१४ सप्टेंबर २०१७ - मुख्य याचिकादार असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) या योजनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.३ ऑक्टोबर २०१७ - सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली.२ जानेवारी २०१८ - केंद्र सरकारने निवडणूक रोखे योजनेला अधिसूचित केले.७ नोव्हेंबर २०२२ - वर्षभरात ७० दिवसांवरून ८५ दिवस रोखेविक्री करण्याबाबत सुधारणा करण्यात आली.१६ ऑक्टोबर २०२३ - सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठाने याप्रकरणी दाखल झालेल्या याचिका ५ सदस्यीय घटनापीठाकडे पाठविल्या.३१ ऑक्टोबर २०२३ - सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील घटनापीठाने याचिकांवर सुनावणी सुरू केली.२ नोव्हेंबर २०२३ - सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णयराखून ठेवला.१५ फेब्रुवारी २०२३ - निवडणूक रोखे योजना ही माहिती अधिकार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी असल्याचे सांगत ती रद्दबातल ठरविली.

निवडणूक प्रक्रियेत काय घडते, हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ही केंद्र सरकारला बसलेली चपराक आहे. निवडणूक रोख्यांची बेकायदेशीर योजना कशी योग्य आहे हे पटवून देण्यासाठी युक्तिवाद करण्यात आले होते. मात्र अखेर सत्याचा विजय झाला. - पी. चिदंबरम, माजी केंद्रीय वित्तमंत्री

ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत. पक्षांना देणगी देणाऱ्यांबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे ज्या पक्षाने देशात ही योजना आणली त्यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल नेहमीच पारदर्शकतेच्या बाजूने आहे. ममता बॅनर्जी निवडणूक सुधारणांसाठी नेहमीच आवाज उठवत आहेत. - कुणाल घोष, प्रवक्ते, तृणमूल

या निकालामुळे जनतेचा लोकशाहीवरील विश्वास टिकून राहील. गेल्या पाच ते सात वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा सर्वात महत्त्वाचा व ऐतिहासिक स्वरूपाचा निकाल आहे. निवडणूक रोख्यांच्या योजनेविरोधात अनेक लोकांनी आवाज उठविला होता. - एस. वाय. कुरेशी,माजी मुुख्य निवडणूक आयुक्त

निकालाचे आम्ही स्वागत करतो. पक्षांना मिळणाऱ्या प्रत्येक देणगीच्या व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. या योजनेमुळे अनामिक देणगीदारांद्वारे मिळणाऱ्या निधीचा भारतीय जनता पक्षालाच सर्वाधिक फायदा होत होता. निवडणूक रोखे योजना लागू केल्यापासून हे चित्र कायम होते.- क्लाईड क्रॅस्टो,प्रवक्ता, शरद पवार गट

निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना निधी मिळतो. त्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणखी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. पूर्वी रोख रकमेच्या स्वरुपात निधी दिला जात असे. आता तीच पद्धत पुन्हा रुढ होईल का हेही पाहावे लागणार आहे. - एन. गोपालस्वामी,माजी मुख्य निवडणूक आयुक्त

 

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBanking Sectorबँकिंग क्षेत्र