नाताळचा सण देशात परंपरागतरीत्या व उत्साहात साजरा
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:09+5:302014-12-25T22:41:09+5:30
नवी दिल्ली-संपूर्ण देशात नाताळचा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री चर्चमध्ये विशेष प्रार्थना घेण्यात आल्या व आनंदाची गीते गायली गेली.

नाताळचा सण देशात परंपरागतरीत्या व उत्साहात साजरा
न ी दिल्ली-संपूर्ण देशात नाताळचा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री चर्चमध्ये विशेष प्रार्थना घेण्यात आल्या व आनंदाची गीते गायली गेली. चर्चमध्ये घंटांचा नाद होताच ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये या विशेष प्रार्थनांसाठी पोहचले. ठिकठिकाणी या सणाचा आनंदोत्सव साजरा होत असलेला दिसत होता. ख्रिसमस ट्रीला रंगबिरंगी फितींनी व भेटींनी सजविण्यात आले होते. या सणानिमित्त बाजारपेठेतही बरीच गर्दी होती. लाल रंगाचे कपडे ल्यायलेले व पांढरी दाढी राखलेले सांताक्लॉज मुलांना खाऊ वाटत होते. अनेक ठिकाणी सामूहिक भोजनाचे आयोजन केले होते तर केक खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्याकरिता नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईट्स व वॉट्स अपसारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. कडाक्याच्या थंडीला न जुमानता नागरिक मोठ्या संख्येने प्रार्थनेसाठी बाहेर आले होते. यावेळी शहरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.