शिक्षणाने भारावलेली ख्रिश्चन आदिव
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:02+5:302015-08-20T22:10:02+5:30
शिक्षणाने भारावलेली ख्रिश्चन आदिवासी संघटना

शिक्षणाने भारावलेली ख्रिश्चन आदिव
श क्षणाने भारावलेली ख्रिश्चन आदिवासी संघटनादेविदास गावकर : खोतीगावगावातील मुलांना व्यासपीठ, त्यांच्या कलांना व शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देण्याच्या नावाने अनेक संघटना गावागावात निर्माण झाल्या आहेत. पण त्यातील किती संघटना सखोलपणे काम करतात असा प्रश्न निर्माण करुन त्याचा शोध घेतल्यास बर्याच संघटना संस्था हय़ा काही कार्यक्रमापुरत्याच र्मयादित असल्याचे आम्हाला दिसतात.केपे तालुक्यातील ख्रिश्चन आदिवासी युवकांनी 2008 साली तयार केलेली ख्रिश्चन आदिवासी संघटना मात्र शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता, त्यांना व्यासपीठ देण्याच्या हेतूने दरवर्षी खास विद्यार्थी प्रेरणेच्या नावाने दहावी, बारावी आणि ग्रॅज्यूएट झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला रोख बक्षिस, स्मृतिचिन्ह आणि संघटनेतर्फे शुभेच्छापत्रक देऊन मुलांचा सन्मान केला जातो.संस्थेची स्थापना झाल्यापासून 2010 साली 18, 2011 साली 35, 2012 साली 40, 2013 साली 45, 2014 साली 67 आणि 2015 साली 79 मिळून सहा वर्षात 284 विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले असल्याची माहिती अँड. जॉन फर्नाडिस यांनी दिली.मुलांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांना शिक्षणाचे महत्वही कळायला पाहिजे याच धर्तीवर अँड. फर्नाडिस यांनी सांगितले, ‘शिकतले ते जिंकतले’ हे गीत स्वत: लिहून त्याची चित्रफित करुन मुलांवर आधुनिक यंत्राव्दारे प्रभाव पाडण्याचे कार्यही एका बाजूने चालू केले असता, दुसर्या बाजूने आपली परंपरा लोप पावत आलेली गीते, नाव या प्रकाराचे संकलन करुन ती नवीन पिढीला शिकविण्याचेही काम करण्यास सुरवात केलेली आहे.दरम्यान, पारंपारीक पध्दतीतील जीवनशैली बरोबर लग्नविधी कशाप्रकारे आम्हाला फायदेशीर आणि त्यामुळे भविष्यातील फायदे याची जाणीव देण्याबरोबर त्याच्याही चित्रफिती करुन परंपरेचे दर्शन घडविण्याचे कार्यही हाती घेतल्याने शिक्षणाच्या वाटचालीबरोबर परंपरा जतन करण्याचेही काम हाती घेतले आहे.ही संस्था ज्या गावात जन्मली त्याच गावात बंद पडलेला इंत्रूज नावाचा पारंपारीक उत्सवही चक्क 15 वर्षानंतर सुरु करण्याचे धाडस हय़ा आदिवासी संघटनेच्या सवंगड्यांनी सुरु करुन आधुनिक युगात एक क्रांतीकारी पारंपारीक पाऊल उचलले आहे ही एक ताकदच म्हणावी लागेल असे फर्नाडिस यांनी बोलताना स्पष्ट केले.आताच्या बदलत्या काळानुसार आता मुलांना सुधारण्यासाठी सुध्दा जर चुका दाखविल्यास त्यांना राग येतो त्यामुळे हय़ा मानसिकतेचा आणि परिस्थितीचा विचार करुन जे जे कोणी दहावी बारावी आणि ग्रॅज्यूएट पास होतील त्या प्रत्येकाला पुढील शिक्षणाच्या आणि मागील शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यास आम्ही संघटनेतर्फे विशेष सन्मान केला जातो आणि त्याचे आणखी एक विशेष म्हणजे हय़ा कार्यासाठी आदिवासी संघटना कोणत्याही राजकीय किंवा अन्य बलाढय़ पैसेवाल्याकडून देणगीही स्विकारत नसून संघटनेचेच सदस्य आपल्यापरीने विविधरित्या पैसे गोळा करतात व आपआपल्या वडील किंवा अन्य प्रेमळ व्यक्तीच्या स्मृतीच्या स्वरुपाने काहीजण देणगी देतात. हे संघटनेतर्फे तयार झालेल्या निस्वार्थ व्यक्तिमत्वाची जडणघडण असल्याचे सध्याचे आदिवासी संघटनेचे अध्यक्ष कायतान रिबेलो यांनी सांगितले.सध्या आमचे हे कार्य अखंडरित्या चालूच रहाणार असून वेळ आणि काळानुसार यात गरजेनुसार बदल घडवून आणण्यास संघटना सदोदीत तप्तररित्या कार्यरत असल्याचे शेवटी रिबेलो यांनी स्पष्ट केले.ढँ3 : 1908-टअफ-01कॅप्शन: सन्मान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसह प्रमुख पाहुणे व संघटनेचे पदाधिकारी. (छाया: देविदास गावकर)