भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतराचे आवाहन चौबे चौक ते बेंडाळे चौक : पक्के अतिक्रमणही काढणार
By Admin | Updated: March 15, 2016 00:33 IST2016-03-15T00:33:24+5:302016-03-15T00:33:24+5:30
जळगाव : मनपा नगररचना विभागाने चौबे चौक ते सुभाष चौक व तेथून बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करून त्यावर खुणा केल्या. त्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे तर या रस्त्यावरील हॉकर्सला गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतरित होण्याचे आवाहन अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आले आहे.

भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतराचे आवाहन चौबे चौक ते बेंडाळे चौक : पक्के अतिक्रमणही काढणार
ज गाव : मनपा नगररचना विभागाने चौबे चौक ते सुभाष चौक व तेथून बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करून त्यावर खुणा केल्या. त्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे तर या रस्त्यावरील हॉकर्सला गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतरित होण्याचे आवाहन अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आले आहे. नगररचना विभागाच्या पथकाने शुक्रवारीच या रस्त्याचा नकाशा तयार केला होता. त्यानुसार सोमवारी या रस्त्याची दोन्ही बाजूने मोजणी करून अतिक्रमणात असलेल्या पक्क्या बांधकामांवर खुणा करण्यात आल्या. सोमवारी एकाच दिवसात हे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी नगररचना विभागातील सर्व अभियंते कामाला लागले होते. तर अतिक्रमण विभागातर्फे या दुकानदारांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले जात होते. आयुक्तांची घेतली भेटसायंकाळी या रस्त्यावरील दुकानदारांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. हा रस्ता आधीच रूंद असल्याने बांधकाम न तोडण्याची मागणी केली. मात्र जे बांधकाम अतिक्रमणात असेल, ते तोडण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. ---- इन्फो---हॉकर्सचा अतिक्रमणच्या पथकाशी वादशिवाजी रोडच्या कोपर्यावर काही फळ विक्रेत्यांनी पुन्हा गाड्या लावण्याचा प्रयत्न केल्याने अतिक्रमण विभागाचे पथक सोमवारी दुपारी तेथे कारवाईसाठी गेले. त्यावेळी संबंधित हॉकर्सने अरेरावी करीत, वाद घातला. त्यामुळे तेथे गर्दी जमली होती. अखेर मनपाच्या पथकाने लोटगाडी जप्त केली. ---- इन्फो---शिवाजीरोडवर चौकातील अतिक्रमण तोडलेशिवाजी रोडवरील जुना कापड बाजारातील चौकातील वर्मा ट्रान्सपोर्टचे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले.