अश्लील चित्रिकरण करणार्या प्राध्यापकाला चोप
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:22+5:302015-07-22T00:34:22+5:30
र}ागिरीतील घटना : नराधमाला अटक

अश्लील चित्रिकरण करणार्या प्राध्यापकाला चोप
र} ागिरीतील घटना : नराधमाला अटकगुहागर : शहरातील तेलीवाडी येथे एकत्रित भाड्याने राहणार्या महाविद्यालयीन तरुणींच्या बाथरुममध्ये शूटिंग करणारा प्राध्यापक किरण दिनकर शिवणकर(30) मंगळवारी रंगेहाथ सापडला. संतप्त ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो सांगली जिलतील तासगावचा आहे.तो पत्नीसोबत दुसर्या मजल्यावर राहात होता. याच घराच्या खालच्या बाजूला कौलारू पडवीमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या पाच तरुणी भाड्याने एकत्रित राहात होत्या. किरण शिवणकर हा शृंगारतळी येथील एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. त्याची पत्नी गुहागरातील एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे.शिवणकर याची पत्नी गेली दोन दिवस सांगली येथे घरी गेली होती. याचा फायदा घेत किरण याने दुसर्या मजल्यावरून खालच्या बाथरूममध्ये छोटा कॅमेरा सोडला होता. हा कॅमेरा त्याने संगणक व लॅपटॉपला जोडला होता. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)