चिटफंड घोटाळा : बिजद खासदाराविरुद्ध आरोपपत्र दाखल
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:03+5:302015-02-20T01:10:03+5:30
नवी दिल्ली : सीबीआयने गुरुवारी नबादिगांता कॅपिटल कंपनीशी संबंधित चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात बिजदचे लोकसभेतील खासदार रामचंद्र हंसदा आणि अन्य सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

चिटफंड घोटाळा : बिजद खासदाराविरुद्ध आरोपपत्र दाखल
न ी दिल्ली : सीबीआयने गुरुवारी नबादिगांता कॅपिटल कंपनीशी संबंधित चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात बिजदचे लोकसभेतील खासदार रामचंद्र हंसदा आणि अन्य सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या मयूरभंगचे खासदार हंसदा, नबादिगांता कॅपिटल सर्व्हिसेसचे सीएमडी अंजनबलीयारसिंग, प्रदीपकुमार पटनायक, कार्तिकेय परिदा, सुबर्णा नायक आणि हितेशकुमार बागरती तसेच नबादिगांता कॅपिटल सर्व्हिसेस लि. आणि नबादिगांता ॲग्रो इंडस्ट्रीज लि. या दोन कंपन्यांना आरोपी बनविण्यात आले आहे. भुवनेश्वरच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. (वृत्तसंस्था)