शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:12 IST

आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करताना जे घडलं ते मन सुन्न करणारे

Chinnaswamy Stadium Stampede RCB’s victory celebration in Bengaluru : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अर्थात RCBian चाहता हा माझ्या रक्तात RBC नव्हे तर  RCB घटक आहे, असं म्हणत विराट कोहलीच्या संघावर प्रेम व्यक्त करत आलाय. या प्रेमापोटी चाहत्यांच रक्त सांडेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण RCB नं ट्रॉफी जिंकली अन् IPL चॅम्पियन्सना पाहण्यासाठी बंगळुरुमध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी केली. आरसीबीच्या स्वागतासाठी आधी  खुल्या बसमधून खेळाडूंची जंगी मिरवणूक काढण्याचा प्लॅन ठरला होता. पण वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊ ते नियोजन बारगळले.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सेलिब्रेशनचा घाट घातला अन् तो घात करणारा ठरला

चाहत्यांनी संघाच्या पहिल्या विजयाच्या सेलिब्रेशनचा घाट घातला अन् तो काही चाहत्यांसाठी घातक ठरला. बंगळुरु शहरात आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करताना जे घडलं ते मन सुन्न करणारे असे होते. लाल जर्सीतील RCB च्या संघाने १७ वर्षांनी पहिली ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करताना जमलेली गर्दी अन् त्यादरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत काही चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींना गंभीर दुखापत झाली असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे चित्रही पाहायला मिळाले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

नेमकं काय घडलं?

पाऊस असतानाही विधान सौधा ते चिन्नास्वामी एम. चिन्नास्वाम स्टेडियम या मार्गावर  हजारोच्या संख्येनं चाहत्यांनी हजेरी लावली होती. समोर येणाऱ्या माहितीनुसार, चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून अरुंद गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला अन् एकच गोंधळ उडाला. या घटनेत १० पेक्षा अधिक लोकांनी जीव गमावला असून त्याहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या दुर्देवी घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

टॅग्स :StampedeचेंगराचेंगरीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरBengaluruबेंगळूरAccidentअपघातcricket off the fieldऑफ द फिल्ड