चिनी पाणबुडीची श्रीलंकेत गस्त
By Admin | Updated: September 29, 2014 06:05 IST2014-09-29T06:05:00+5:302014-09-29T06:05:25+5:30
चिनी पाणबुडी श्रीलंकेच्या कोलंबो येथील लांब किनारपट्टीवर गस्त घालत असल्याचे सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात लक्षात आले

चिनी पाणबुडीची श्रीलंकेत गस्त
नवी दिल्ली : चिनी पाणबुडी श्रीलंकेच्या कोलंबो येथील लांब किनारपट्टीवर गस्त घालत असल्याचे सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात लक्षात आले असून, त्यामुळे चीनच्या लष्कराची पीएलएची आरमारी वाहिनी हिंदी महासागरात जम बसवित आहे काय? असा संशय भारताला येत आहे.
पीएलए- एन (पीपल्स लिबरेशन आर्मी - नेव्ही)आपल्या सागरी सीमा ओलांडून भारतीय सागरी सीमावर अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहे.
चीनच्या युद्धनौका व पाणबुड्या बंगालच्या उपसागरात शिरकाव करतील काय यावर भारतीय आरमार काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. पण पीएलए-एनची पाणबुडी उघडरित्या भारताच्या परसात आल्याचे मात्र हे पहिलेच उदाहरण आहे. डिझेल- इलेक्ट्रिक टाईप ०३९ साँग क्लास ही चिनी पाणबुडी कोलंबोच्या आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर होती. हे टर्मिनल चीनच्या आर्थिक मदतीतूनच उभे राहिले आहे. ७ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही पाणबुडी कोलंबो बंदरात दिसली होती. चीनचे अध्यक्ष शी जिपपींग यांच्या श्रीलंकाव मालदीव दौऱ्याचा हा काळ आहे. चीनला जुना सागरी रेशमी मार्ग सुरु करण्याची अत्यंत इच्छा असून, हा मार्ग हिंदी महासागरातून जात असल्याने भारतासाठी ती चिंतेची बाब आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)