पाक सैनिकांना चीनकडून धडे!
By Admin | Updated: November 16, 2014 02:22 IST2014-11-16T02:22:32+5:302014-11-16T02:22:32+5:30
भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचे वृत्त आहे.

पाक सैनिकांना चीनकडून धडे!
शस्त्र प्रशिक्षण : सीमा सुरक्षा दलाचा केंद्र सरकारला अहवाल; सीमेलगत हालचाली वाढल्या
नवी दिल्ली : भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजाैरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिले जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचे वृत्त आहे.
राजाैरी सेक्टरला लागून असलेल्या तिस:या आणि चौथ्या पाकव्याप्त ब्रिगेड भागातील काही पाकिस्तानी चौक्यांमध्ये चिनी लष्करी प्रशिक्षक पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. तथापि चिनी प्रशिक्षक पाकिस्तानी सैनिकांना नेमक्या कोणत्या शस्त्रंचे प्रशिक्षण देत आहेत, याचा तपशील मात्र या अहवालात दिलेला नाही.
पाकिस्तानी रेंजर्स आंतरराष्ट्रीय सीमेवरील काही प्रमुख चौक्यांचा ताबा पाकिस्तानी लष्करी युनिटकडे सोपवित आहेत आणि तेथे बंदुका, उखळी तोफा आणि स्निपिंग उपकरणो तैनात करण्यात येत आहेत. याशिवाय राजाैरी सेक्टरला लागून असलेल्या 3 पीओके ब्रिगेड आणि कोटली भागात पाकिस्तानी तोफखान्याचे सैन्य कोट कटेरालगत 856 मुजाहिदीनसोबतच 8 सिंधचे सैन्य तैनात केलेले आहे.
अलीकडच्या काळात पंजाबच्या अबोहर व गुरुदासपूर जिल्ह्यांना लागून असलेल्या सीमेच्या पलीकडे पाकिस्तानने अनेक नवे टेहळणी मनोरे उभे केल्याचेही निदर्शनास आल्याचेही या अहवालात नमूद केले गेले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाक लष्कराच्या कवायती
श्रीगंगानगर सेक्टरला लागून असलेल्या सीमेजवळ उखळी तोफा चालविणारी सैन्य तुकडी तैनात करण्यात आली आहे. जैसलमेर सेक्टरच्या बाजूला असलेल्या कांडेराजवळ पाकिस्तानी तोफखान्याचे जवान 18 अवजड वाहनांसमवेत लष्करी कवायती करीत आहेत.
घुसखोरीची तयारी सुरू
च्सीमा सुरक्षा दलाने अहवालात असाही इशारा दिला की, दहशतवाद्यांनी सियालकोट भागातील सीमावर्ती भागांत मोठय़ा संख्येने जमवाजमव चालविली असून, निवडणुकीच्या धामधुमीत जम्मू-कामीरमध्ये घुसखोरी करण्याची त्यांची तयारी सुरू आहे.
च्तसेच लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिजबुल
मुजाहिदीन संघटनांच्या दहशतवाद्यांनी अनंतनाग, शोपियान व पुलवामा या दक्षिण काश्मीरच्या जिल्ह्यांमध्ये हालचाली वाढविल्या असून, त्यांच्याकडून सुरक्षा दलांच्या वाहन-ताफ्यांवर व निवडणुकीच्या काळात राजकीय कार्यक्रमांवर हल्ले केले जाण्याची शक्यता आहे.
सीमेवर पाकचा गोळीबार
च्जम्मू- जिल्ह्यातील अरनिया भागात असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील लष्कराच्या चौक्यांवर पाक जवानांनी शनिवारी गोळीबार करून शसंधीचे उल्लंघन केले.
च्या गोळीबाराला भारतीय जवानांनी तत्काळ उत्तर दिले. काही काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू राहिला. मात्र यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पाकने बुधवारीही जम्मू व सांबा क्षेत्रत रात्री उशिरार्पयत गोळीबार केला होता.
11भारतीय नागरिक ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत पाकच्या गोळीबारात ठार झाले. 9क्हून अधिक नागरिक जखमी झाले.
32हजार नागरिक पाकिस्तानच्या आगळीकीमुळे जम्मू,
कठुआ व सांबा जिल्ह्यातून विस्थापित झाले आहेत.
परराष्ट्र मंत्रलयाची थंडी प्रतिक्रिया
च्ब्रिस्बेन : येथे सुरू झालेल्या जी-2क् शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिल्या दिवसाचे कार्यक्रम संपल्यानंतर या वृत्ताकडे लक्ष वेधले असता परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते सैयद अकबरुद्दीन म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हे वृत्त खरे असेलही वा नसेलही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
च्अकबरुद्दीन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची शनिवारी सकाळी भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी अशा कोणत्याही वृत्ताकडे पंतप्रधानांचे लक्ष न वेधल्याने मोदी यांनी हा विषय शी जिनपिंग यांच्याकडे काढला नाही.