शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

पंतप्रधान मोदी, PMO, दलाई लामा यांच्यावर नजर, चीनची हेरगिरी; चौकशीतून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 14:12 IST

Chinese Espionage Racket : पकडण्यात आलेल्या चीनी  हेरगिरांची चौकशी केली असता ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली -  भारतामधीलचीनच्या हेरगिरीचा आता अत्यंत महत्वाचा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाव्यतिरिक्त, दलाई लामा आणि भारतात लावण्यात आलेल्या सुरक्षा उपकरणांवर देखील चीनी गुप्तहेरांचे लक्ष होते. पकडण्यात आलेल्या चीनी  हेरगिरांची चौकशी केली असता ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये भारतातील मंत्रालयामध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी आणि ब्यूरोक्रेट्सबाबत माहिती गोळा केली जात असल्याची माहिती उघड झाली आहे.

चीनी हेर क्विंग शीची अधिक चौकशी केली असता चीनने भारतातील हेरगिरांच्या टीमला पंतप्रधान कार्यालयासह मोठ्या कार्यालयांमधील महत्त्वाची माहिती गोळा करण्याचं काम दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच कार्यालयामध्ये कोणती व्यक्ती सर्वात महत्त्वाची आहे, कोण कोणत्या पदावर कार्यरत आहे आणि तो किती प्रभावी आहे? अशी माहिती गोळा करण्याबाबत त्यांना सांगण्यात आले होते.

चीनी हेरगिरांच्या टीममध्ये कोलकात्यातील एका महिलेचा समावेश 

चीनी हेरगिरांच्या टीममध्ये महाबोधी मंदिरातील एक प्रमुख बौद्ध भिक्षू आणि कोलकात्यातील एका महिलेचा समावेश असल्याचं चौकशीत स्पष्ट होत आहे. क्विंग शी आणि या महिलेची भेट घडवून आणण्यात आली होती. ही महिला क्विंग शीला महत्त्वाची कागदपत्रं देत असे आणि क्विंग ती कागदपत्रं ट्रान्सलेट करून चीनला रवाना करत असे. चीनी हेराच्या चौकशीत काही दस्तावेज सापडले आहेत. त्यानुसार, पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी आणि दलाई लामा यांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळवली जात होती. 

चीनी गुप्तहेराला चीन दरमहा एक लाख रुपये देतं

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या महिन्यात क्विंग शी याच्यासह त्याचा नेपाळी साथीदार शेर बहादूर आणि भारतीय पत्रकार राजीव शर्मा यांना अटक केली होती. हे तिघेही तिहारच्या तुरुंगात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात हेरगिरी करण्यासाठी या चीनी गुप्तहेराला चीन दरमहा एक लाख रुपये देत होतं. ज्या दक्षिण दिल्ली भागात क्विंग राहात होती. त्या घराचं भाडं दरमहा 50 हजार रुपये होते. हे भाडे कोण भरत होते याचा तपास केला जात आहे. जुलैमध्येच भारत सरकारने हेरगिरीसाठी वापरल्या जाणार्‍या 200 हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनDalai Lamaदलाई लामा