शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 3:21 AM

दिवाळखोरीचा खटला; सात संस्थांची कर्जे थकवली

नवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनीकडे चीनच्या बँकांनी २.१ अब्ज डॉलरच्या कर्जाच्या वसुलीची मागणी केली आहे. आरकॉम ही कंपनी या महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळखोरीत निघाली असून, कंपनीविरुद्ध दिवाळखोरी न्यायालयात कर्जदाता संस्थांनी दावे दाखल केले आहेत.कर्ज वसुलीचा दावा करणाऱ्या चिनी बँकांत चायना डेव्हलपमेंट बँक, इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना आणि एक्झिम बँक ऑफ चायना यांचा समावेश आहे. चीन सरकारच्या मालकीची चायना डेव्हलपमेंट बँक यातील सर्वांत मोठी कर्जदाता बँक आहे. या बँकेचे आरकॉमकडे ९,८६० कोटी रुपये (१.४ अब्ज डॉलर) थकले आहेत. एक्झिम बँक ऑफ चायनाने ३,३६० कोटी, तर इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाने १,५५४ कोटी रुपये कंपनीकडे मागितले आहेत. आरकॉमने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.आरकॉम कंपनीविरुद्ध दिवाळखोरी न्यायालयात खटला सुरू आहे. आपल्या मालमत्ता विकून कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहेत. अनिल अंबानी यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने आरकॉमच्या मालमत्ता १७,३०० कोटी रुपयांना विकत घेण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, नियामकीय अडथळ्यांमुळे हा व्यवहार होऊ शकला नाही.रिलायन्स कम्युनिकेशनकडे देश-विदेशातील प्रमुख सात संस्थांचे कर्ज थकले असून, त्यातील एक चतुर्थांश कर्ज चिनी बँकांचे आहे. दिवाळखोरी न्यायालयात आरकॉमविरुद्ध तब्बल ५७,३८२ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कर्जदात्यांनी दावे दाखल केले आहेत.आधी टळली होती अटकएरिक्सन एबीने आरकॉमविरुद्ध दाखल केलेल्या ८० दशलक्ष डॉलरच्या खटल्यात अनिल अंबानी यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली होती. मुकेश अंबानी यांनी ही रक्कम दिल्याने अनिल अंबानी यांची जेलवारी टळली.

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्स