शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:39 IST

Chinese National Caught In Kashmir: काश्मीरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लष्कराच्या गुप्तचर विभागाने इंटरनेटवर एक संशयास्पद संभाषण इंटरसेप्ट केल्यानंतर एका चिनी नागरिकाला ताब्यात घेतले आहे.

काश्मीरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लष्कराच्या गुप्तचर विभागाने इंटरनेटवर एक संशयास्पद संभाषण इंटरसेप्ट केल्यानंतर एका चिनी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. हा चिनी नागरिक बेकायदेशीररीत्या लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये घुसला होता.  २९ वर्षीय चिनी नागरिक हू कोंगताई याला सध्या काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या परवानगीशिवाय प्रवास आणि व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. त्याला श्रीनगरजवळ बडगाम जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठामधून फिजिक्समधून पदवी घेतलेल्या हू याच्या पासपोर्टमधून त्याने अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील, फिजी आणि हाँगकाँग या देशांमध्ये प्रवास केल्याचे दिसून येत आहे. हू हा १९ नोव्हेंबर रोजी टुरिस्ट व्हिसावर नवी दिल्ली येथे आला होता. हा व्हिसा ३० डिसेंबर २०२५ पर्यंत वैध होता. त्याला या व्हिसामधून वाराणसी, सारनाथ, गया, कुशीनगर, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्ली या काही मोजक्या शहरांमध्ये फिरण्याची परवानगी होती. मात्र तो २० नोव्हेंबर रोजी विमानतळावरील फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसमधील काऊंटरवर आवश्यक नोंदणी न करताच लेह येथे गेला होता. लडाख आणि जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील परिसरात जाण्यासाठी परदेशी नागरिकांना विशेष परवानगी घ्यावी लागते. हा चिनी नागरिक श्रीनगरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबला. तसेच त्याने बाजारामधून एक भारतीय सिमकार्ड विकत घेतले. ही बाब परदेशी पर्यटकांसाठी बनवण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन होती.

त्यानंतर लष्कराकडून इंटरसेप्ट करण्यात आलेल्या इंटरनेटवरील संभाषणानंतर सुरक्षा एजन्सींना अलर्ट करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यन, त्याच्या मोबाईल फोनच्या तपासामधून सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवणारी सर्च हिस्ट्री समोर आली आहे.

त्याने काश्मीर खोऱ्यातील सीआरपीएफच्या तैनातीबाबत, कलम ३७० बाबत संबंधित माहितीचा शोध घेतला होता. तसेच त्याने काही संवेदनशील भागांचा दौराही केला होता. हू कोंगताई हा सध्या बडगाम जिल्ह्यातील हुमहामा पोलीस चौकीत असून, त्याची कससून चौकशी केली जात आहे. कोंगताई याने व्हिसा नियमांचं उल्लंघन केलं असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला चीनमध्ये डिपोर्ट केलं जाईल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Chinese National Detained in Kashmir for Illegal Travel, Suspicious Activity

Web Summary : A Chinese national, Hu Kongtai, was arrested in Kashmir for violating visa rules and unauthorized travel. He allegedly searched for information about CRPF deployments and Article 370. Authorities are investigating his suspicious activities and will deport him after legal procedures are completed.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरchinaचीनIndiaभारतladakhलडाख