शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 12:49 IST

गेल्या काही दिवसांपूर्वीही चिनी लष्करी हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत घिरट्या घालताना दिसली होती. त्यावेळीसुद्धा भारतीय हवाई क्षेत्राचे त्यांनी उल्लंघन केले होते.

नवी दिल्लीः कोरोना संकटाचा अनेक देश सामना करत असतानाच चीनच्या कुरापती सुरूच आहेत. लॉकडाऊनदरम्यान चीनने पुन्हा एकदा भारतीय सीमा ओलांडली आहे. चीनला योग्य ते प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने लडाखमध्ये लढाऊ विमान तैनात केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीही चिनी लष्करी हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत घिरट्या घालताना दिसली होती. त्यावेळीसुद्धा भारतीय हवाई क्षेत्राचे त्यांनी उल्लंघन केले होते.चिनी हेलिकॉप्टरची हालचाल सुरू होताच भारतीय लढाऊ विमानांना लडाख सेक्टरमधील सीमा भागात तैनात करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी जवळच्या बेसकॅम्पवरून उड्डाण भरले आणि चिनी हेलिकॉप्टर्सला हुसकावून लावले. विशेष म्हणजे अशा स्थितीतही भारतीय लढाऊ विमानांनी भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले नाही. गेल्या आठवड्यात अशी घटना घडली होती, जेव्हा भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांसमोर आले होते. यानंतर दीडशेहून अधिक चिनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. लढाऊ विमान तैनात करून हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्याच्या चिनी प्रयत्नांना बर्‍याच वर्षांत प्रथमच प्रतिसाद मिळाला आहे.चिनी आक्रमकतेचे उद्दिष्ट पाकिस्तानला पाठिंबा देणे आणि भारतासमवेत नवीन आघाडी उघडण्याचं आहे. त्याचबरोबर कोरोनाबद्दलच्या आरोपांवरून जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. चीनप्रमाणेच पाकिस्तानची लढाऊ विमानही सीमा भागात निरंतर उडत आहेत. पाकिस्तानी हवाई दलाचे विमान एफ -16, जेएफ -17 आणि मिराज सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत. हंदवाडा हल्ल्यानंतर भारताकडून होऊ घातलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरलेला आहे. त्याचदरम्यान भारतीय वायु सेना प्रत्येक क्षणी पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. एप्रिलच्या अखेरपासून ‘पीएलए’ने आक्रमक पवित्रा घेतल्याने या ताज्या घटनांना सुरुवात झाली आहे. २७ एप्रिल रोजी चिनी सैन्याचे एक वाहन भारताच्या हद्दीत आले होते. भारतीय सैनिकांनी हटकल्यावर ते परत माघारी गेले होते.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लडाकमधील पॅनगाँग त्से सरोवराच्या उत्तर किना-यावर तसेच चुमार व यांगत्से भागातही अशाच घटना घडल्या होत्या. त्याआधी जून २०१७ मध्ये सिक्कीमजवळच्या डोकलाम पठारावर दोन्ही सैन्यांमध्ये ७३ दिवसांचा वाद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे पहिली अनौपचारिक शिखर बैठक झाल्यानंतर त्या वादावर पडदा पडला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्याCoronaVirus News : येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधान

CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :chinaचीनIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दल