शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

युनिफॉर्म हब निर्माण झाल्यास चीनला फटका; बसणार मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:09 IST

बांगलादेशच्या कामगारांचीही पिळवणूक; जनमानसात जनजागृती होण्याची गरज

मुंबई : चीनमधून काही वस्तू थेट भारतात येतात, तर काही अन्य देशांच्या मार्गे भारतात पाठविल्या जातात. भारतात येणारे चिनी बनावटीचे कपडे बांगलादेशमार्गे भारतात येतात. चीनपेक्षा बांगलादेशात कमी वेतनात मजूर उपलब्ध होत असल्याने चीन आपल्याकडील कापड बांगलादेशात पाठविते आणि तिथे ते शिवले जातात. नंतर तेथून तो माल ड्यूटी फ्री होऊ न भारतात येतो, याकडे क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे मुख्य मार्गदर्शक राहुल मेहता यांनी लक्ष वेधले.या सर्व प्रकारांत बांगलादेशच्या लोकांना रोजगार मिळत असला तरी फारसे वेतन मात्र मिळत नाही. म्हणजे त्यांची पिळवणूकच होते आणि भारतात मात्र चिनी कपडे म्हणून काही जण मिरवतात. वास्तविक भारतातील कापड उद्योेग खूप मोठा आहे आणि तो वाढवायला मोठ्या संधीही आहेत. त्यामुळे चिनी कापड वा तयार कपड्यांऐवजी भारतीय कपडे विकत घेतल्यास भारतात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. शाळा, रुग्णालये यासाठी लागणाऱ्या युनिफॉर्मचे कापड चीनहून बांगलादेशात जाणार आणि तिथे ते शिवून झाल्यावर भारतात विकणार, असे करण्याऐवजी भारतातच ठिकठिकाणी युनिफॉर्म हब करणे शक्य आहे. त्याची सुरुवात सोलापूरमध्ये झाली आहे. मात्र, त्याबाबत अधिक जनजागृती होण्याची गरज आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी कपड्यांची होळी केली होती. आता मात्र अशी होळी न करता स्वदेशी कपडे वापरण्यासाठी जनमत तयार केले पाहिजे, असा मतप्रवाह आहे. मेडिकल प्रॉडक्टचे व्यापारी असलेल्या मनीष ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची महाराष्ट्रातील ७० टक्के बाजारपेठ चीनच्या ताब्यात आहे. यात स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन द्यायला हवे.कोरोना संसर्गाच्या काळात भारताते संशोधनापासून मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीटस्साठी मोठी आघाडी घेतली आहे. ती कायम ठेवल्यास वैद्यकीय उपकरणे आणि औषध उद्योग यासाठी भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही, असे या क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे आहे.बहुतांश चिनी मोबाईल कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून पाच वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यांचे उत्पादन भारतातच होऊ लागल्याने, भारतीयांना रोजगार दिल्याने लवकरच यातील अनेक कंपन्यांचा माल हा ‘मेड इन इंडिया’ म्हणूनही मिळू लागेल. मात्र, यामधील गुंतवणूक चीनची असल्यामुळे फायदा मात्र चीनलाच होणार आहे. त्याऐवजी भारतीय तरुण आणि उद्योजक यांनी पुढाकार घेतल्यास आणि त्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन व साह्य मिळाल्यास जगातील मोबाईलची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतातून चीन हद्दपार होऊ शकेल. शिवाय चिनी कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात आपण करणार नाही आणि त्यांचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनणार नाही, अशी शपथ सेलिब्रिटींनी घ्यायला हवी.ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडरपद सोडण्याची मागणीभारतामधील मोबाईलची बाजारपेठ चीनने काबीज केल्याचे दिसत आहे. ओप्पो, वनप्लस, विवो, रिअलमी आणि लिनोवो-मोटोरोला हे लोकप्रिय असलेले ब्रॅण्डस् हे चिनी कंपन्यांच्या मालकीचे आहेत. या ब्रॅण्डस्चे मोबाईल हे चीनमध्ये बनविलेले असून, त्यांचे सर्व पार्टस्ही चिनी बनावटीचे आहेत. त्यामुळे या फोन्सच्या विक्रीचा सर्व लाभ हा चीनला मिळत आहे.अनेक चित्रपट कलावंत व खेळाडू या ब्रॅण्डस्चे अ‍ॅम्बेसिडर आहेत. त्यामध्ये रणबीर कपूर (ओप्पो), रॉबर्ट डाउनी (ज्युनि) (वनप्लस), विराट कोहली (विवो) आणि सलमान खान (रिअल मी) यांचा समावेश आहे. या खेळाडू आणि कलावंतांनी चिनी कंपन्यांचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून काम करणे बंद करावे, अशी मागणीही केली जात आहे.उद्योजक म्हणतात...सध्या कोरोनामुळे चीनला तीन महिने फटका बसला आहे; पण तेवढ्याने भागणार नाही.चिनी माल चीनमधूनच नव्हे, तर तो नेपाळ, बांगलादेश, तैवानमार्गेही येतो. त्या देशांना चीनकडून होणारा आर्थिक फायदा वळवून तो भारताकडून होईल, अशी व्यवस्था उभी करायला हवी.सध्या चीन व तैवानमधून येथून यंत्रे आणून त्यांच्याकडून भारतात थेट गुंतवणूक होत आहे. त्याद्वारे भारतातच ५० टक्के माल तयार होतो. उरलेला अन्य देशांमार्फत येतो.चिनी आक्रमणाला तोंड देऊ न आपल्या धोरणात बदल करणारे व्यापारी टिकले. मात्र, छोटे व्यापारी भरडले जात आहेत. त्यासाठी उत्पादन, आयात आणि व्यापारविषयक धोरणामध्ये बदल करायला हवेत, अशी मागणी व्यापारी आणि त्यांच्या संघटना करीत आहेत.

टॅग्स :chinaचीन