शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चीनवर भरवसा नाय! डोकलाममध्ये अजूनही चीनचे एक हजार सैनिक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 12:38 IST

डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपला असला तरी, अजूनही भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे.

ठळक मुद्देसिक्कीम सीमेजवळच्या डोकलाम भागात चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनने परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतल्याने या वादावर तोडगा निघाला.

नवी दिल्ली - डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपला असला तरी, अजूनही भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे. डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, चीनने अजूनही या भागातून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतलेले नाही. त्यामुळे भारतीय सैन्य पूर्णपणे सर्तक आणि सज्ज आहे. डोकलामच्या ज्या भागात भारत आणि चीनचे सैनिक परस्परासमोर उभे ठाकले होते. त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर चीनचे एकहजार सैनिक तैनात आहेत. 

इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाम भागात चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अडीच महिने हा संघर्ष सुरु होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनने परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतल्याने या वादावर तोडगा निघाला. पण चीननं पुन्हा एकदा डोकलाम परिसरात रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. तिथे चिनी सैनिकांच्या सुरक्षेमध्ये काम सुरु आहे. 

चुंबी खो-यात अजूनही चिनी सैनिक तैनात आहेत. हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी काल गुरुवारी वार्षिक पत्रकारपरिषदेत चुंबी खो-यात चिनी सैनिक असल्याची माहिती दिली. डोकलामवरुन संघर्ष सुरु असताना चीनची 12 हजार सैनिकांची तुकडी, 150 रणगाडे आणि दारुगोळा चुंबी व्हॅलीच्या फारी ड्झाँग भागाच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. येणा-या दिवसात चिनी सैनिकांची ही संख्या कमी होईल असे सूत्रांनी सांगितले. 

दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. या रस्त्याची निर्मिती चिकन नेक नावानं ओळखल्या जाणा-या भारतीय जमिनीजवळ केली होती. दरम्यान हा परिसर भारतासाठी भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असा आहे. दरम्यान डोकलाम विवादावर जवळपास 70 दिवस भारत-चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर उपाय योजना काढत हा वाद मिटवण्यात आला होता आणि दोन्ही देशांनी आपआपल्या सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन