शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अ‍ॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 8:37 PM

लडाखमधील तणाव वाढला असताना भारतानं चीनच्या ५९ अ‍ॅप बंदीवर घातली

नवी दिल्ली: लडाखमधील तणाव वाढल्यानंतर भारतानं चीनला आर्थिक झटका देण्यासाठी ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली. यामुळे चीनला मोठा धक्का बसला असून प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. भारतानं सर्व आघाड्यांवर चीनला धक्के दिल्यानंतर अखेर चीननं गलवान खोऱ्यातून माघार घेतली. मात्र भारतानं दिलेल्या धक्क्यानं चीन मेटाकुटीला आला आहे. आज भारत आणि चीनमध्ये राजदूत स्तरावर चर्चा झाली. त्यामध्ये चीननं अ‍ॅप्सवरील बंदीबद्दल आक्षेप नोंदवला. मात्र भारतानं ही कारवाई सुरक्षेच्या कारणांवरून केल्याचं स्पष्ट केलं. आमच्या नागरिकांच्या तपशीलाशी छेडछाड होऊ नये, यासाठी पाऊल उचलण्यात आल्याचं भारताकडून चीनला सांगण्यात आलं. मोदी सरकारनं गेल्याच महिन्यात ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची कारवाई केली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊजर आणि शेअर इटसारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.आज झालेल्या बैठकीत चिनी राजदूतांनी अ‍ॅप्सवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केला. अ‍ॅप्सवरील बंदी ते चिनी असल्यानं घातलेले नसून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्यानं घातले आहेत, असं उत्तर भारताकडून चीनला देण्यात आलं. भारताकडून अ‍ॅप्सच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानं ते गुगल स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आले.चिनी अ‍ॅप्समुळे धोका का असतो?चिनी अ‍ॅप्समुळे सर्वात धोका प्रायव्हसीला असतो. तुम्ही काय टाईप करता, तुम्ही काय बोलता, ही सगळी माहिती चिनी अ‍ॅप्स साठवतात. याशिवाय चिनी अ‍ॅप्समुळे सुरक्षेलाही धोका असतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींच्या मोबाईलमध्ये चिनी अ‍ॅप्स असल्यास देशाची गोपनीय माहिती शत्रूच्या हाती लागू शकते. भारतीय तरुणाई मोठ्या प्रमाणात चिनी अ‍ॅप्सचा वापर करते. त्यामुळे कंपन्यांना मोठं उत्पन्न मिळतं. 

टॅग्स :chinaचीनTik Tok Appटिक-टॉकladakhलडाख