शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला चीनचा दे धक्का; विमानवाहू नौका देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:57 IST

विमानवाहू नौका विक्रीचं वृत्त चीननं फेटाळल्यानं भारताला दिलासा

नवी दिल्ली: चीननं तयार केलेली पहिली विमानवाहू नौका लाऊनिंग पाकिस्तानला दिली जाणार असल्याचं वृत्त बीजिंगनं फेटाळलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसला आहे. दुसऱ्या देशांना नौदलाची जहाजं विकताना कठोर नियमांचं पालन करावं लागतं, असं चीननं विमानवाहू नौकेचं वृत्त फेटाळताना म्हटलं. चिनी सरकारनं त्यांची पहिली आणि एकमेव विमानवाहू नौका 'लाऊनिंग' पाकिस्तानला विकण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त एका पाकिस्तानी दैनिकानं 10 फेब्रुवारीनं दिलं होतं. पाकिस्तानी नौदलाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी लाऊनिंग नौका चीनकडून देण्यात येणार आहे, असं पाकिस्तानी वृत्तपत्रानं म्हटलं होतं. मात्र चीननं हे वृत्त फेटाळलं. लाऊनिंग चीनकडून पाकिस्तानला दिलं गेलं असतं, तर भारताच्या तुलनेत पाकिस्तान नौदल अधिक सामर्थ्यशाली झालं असतं. विशेष म्हणजे लाऊनिंगमध्ये अनेक बदल करुन, ते अधिक अत्याधुनिक स्वरुपात पाकिस्तानला देण्यात येणार असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं होतं. पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेलं वृत्त चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं पूर्णपणे फेटाळून लावलं. 'मी अद्याप ते वृत्त पाहिलेलं नाही. मात्र दुसऱ्या देशांना नौदलासाठी वापरली जाणारं जहाजं विकण्याआधी चीन नेहमी नियमांचं पालन करतो,' असं मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनाईंग यांनी म्हटलं. 'पाकिस्तानी लष्करासोबत चीनचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे चीन पाकिस्तानासाठी 4 अत्याधुनिक जहाजं तयार करत आहे,' असंदेखील पाकिस्तानी वृत्तपत्रानं म्हटलं होतं. चिनी लष्कराच्या अभ्यासकांनीदेखील लाऊनिंगच्या विक्रीचं वृत्त फेटाळून लावलं. चिनी लष्करानं लाऊनिंगच्या विक्रीसाठी कोणताही करार केला नसल्याचं वृत्त चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रानं दिलं. यासारखा कोणताही करार सरकारच्या विचाराधीन नसल्याचंही चिनी वृत्तपत्रानं स्पष्ट केलं. लाऊनिंग या विमानवाहू नौकेचा वापर प्रशिक्षण आणि युद्धासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे चीन ही नौका विकण्याची शक्यता नाही, असं चिनी संरक्षण दलाच्या अभ्यासकांनी म्हटलं.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारतPakistanपाकिस्तानDefenceसंरक्षण विभाग