चीन आणि पाकिस्तानबाबत सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी मोठे विधान केले. चीनसोबतचा न सुटलेला सीमावाद हा सर्वात मोठा राष्ट्रीय सुरक्षेचा आव्हान आहे, त्यानंतर पाकिस्तानचे छुपे युद्ध आणि हळूहळू भारताला कमकुवत करण्याची त्यांची रणनीती आहे, असे विधान चौहान यांनी केले.
उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी प्रादेशिक अस्थिरता आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम आणि उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह वेगाने बदलणाऱ्या आव्हानात्मक वातावरणात भविष्यातील युद्धाला सामोरे जाण्याची तयारी ही तिसरी आणि चौथी मोठी आव्हाने असल्याचे सांगितले.
अण्वस्त्रे बाळगणाऱ्या शत्रूंकडून धोका
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना सीडीएस म्हणाले की, अण्वस्त्रे बाळगणाऱ्या दोन शत्रूंकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देणे हे भारतासमोरील आणखी एक मोठे आव्हान आहे, कारण कोणत्याही प्रकारच्या पारंपारिक युद्धासाठी भारताला तयार राहावे लागेल.
'सशस्त्र दलांना ऑपरेशन सिंदूर करण्यासाठी पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य देण्यात आले आहे आणि त्याचे उद्दिष्ट केवळ पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणेच नाही तर सीमापार दहशतवादावर रेड रेषा आखणे देखील आहे, असंही जनरल चौहान म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये एनएसएने महत्त्वाची भूमिका बजावली
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये लष्कराला मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, यामध्ये लक्ष्यांची निवड, सैन्य तैनात करणे, तणाव कमी करण्याचे फ्रेमवर्क आणि राजनैतिकतेचा वापर यांचा समावेश होता, सीडीएसने असेही म्हटले आहे .
एनएसएने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लक्ष्यांची निवड, सैन्य तैनात करणे, तणाव न वाढवता कारवाई, तणाव कमी करण्याचे फ्रेमवर्क आणि राजनैतिकतेचा वापर यांचा समावेश होता, असे ते म्हणाले.