डोकलाममध्ये चीनकडून हेलिपॅड, लष्करी चौक्या, सरकारचीच माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:38 AM2018-03-07T01:38:18+5:302018-03-07T01:38:18+5:30

वादग्रस्त डोकलाम भागामध्ये चीनने हेलिपॅड, लष्करी चौक्या तसेच खंदक बांधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मात्र या उत्तरामुळे मोदी सरकारच उघडे पडले आहे.

 China has helipad, military chowk, government information in Dokmal | डोकलाममध्ये चीनकडून हेलिपॅड, लष्करी चौक्या, सरकारचीच माहिती  

डोकलाममध्ये चीनकडून हेलिपॅड, लष्करी चौक्या, सरकारचीच माहिती  

Next

नवी दिल्ली  - वादग्रस्त डोकलाम भागामध्ये चीनने हेलिपॅड, लष्करी चौक्या तसेच खंदक बांधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मात्र या उत्तरामुळे मोदी सरकारच उघडे पडले आहे.
डोकलाममध्ये चिनी सैन्याने गेल्या वर्षी १६ जूनला घुसखोरी केल्यानंतर त्याला भारतीय लष्कराने रोखले होते. दोन्ही देशांचे सैन्य डोकलाममध्ये सुमारे ७३ दिवस समोरासमोर उभे ठाकले होते. चर्चेतून हा तणाव निवळल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर चीनने डोकलाम भागात पुन्हा कारवाया सुरू केल्याने तिथे सर्व आलबेल असल्याचा मोदी सरकारचा दावा फसवा ठरला आहे.

दलाई लामांचा गौरवसमारंभ आता धरमशालामध्ये
दलाई लामा तिबेट सोडून भारताच्या आश्रयाला आल्याच्या घटनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल तिबेटी समर्थकांनी नवी दिल्लीमध्ये समारंभ आयोजित केला होता. पण हा समारंभ आता नवी दिल्लीऐवजी धरमशाला येथे करण्याचे ठरविले आहे. चीनला न दुखावण्यासाठी भारताने हे केल्याची टीका होत आहे.

Web Title:  China has helipad, military chowk, government information in Dokmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.