घुसखोरी करुन चीनने १०० भारतीय जवानांना घेरले

By Admin | Updated: September 15, 2014 17:39 IST2014-09-15T17:14:24+5:302014-09-15T17:39:47+5:30

चीनचे राष्ट्रपती भारत दौ-यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे.

China encircled 100 Indian soldiers | घुसखोरी करुन चीनने १०० भारतीय जवानांना घेरले

घुसखोरी करुन चीनने १०० भारतीय जवानांना घेरले

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १५ - चीनचे राष्ट्रपती भारत दौ-यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळे भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. 
चीनी जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना आव्हान देण्याचे उद्योग गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. ११ सप्टेंबर रोजी ३० चीनी सैनिक भारतीय हद्दीच्या अर्धा किलोमीटर आत आले व त्या भागात त्यांनी तंबूही उभारला होता. यानंतर आता ३०० चिनी सैनिकांनी चुमूर भागात घुसखोरी १०० भारतीय जवानांना घेरल्याचे वृत्त आहे. यामुळे नियंत्रण रेषेवरील वातावरण चांगलेच तापले आहे.  

Web Title: China encircled 100 Indian soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.