मंडईतून चिमुकली बेपत्ता
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
मंडईतून चिमुकली बेपत्ता

मंडईतून चिमुकली बेपत्ता
म डईतून चिमुकली बेपत्तानागपूर : मंडई पाहण्यासाठी गेलेली ३ वर्षाची चिमुकली हरविल्यामुळे कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फिर्यादी आपल्या ३ वर्षाच्या चिमुकलीला घेऊन डिप्टी सिग्नल, आरटीओ कार्यालयाजवळ मंडई पाहण्यासाठी गेले होते. अचानक त्यांची चिमुकली त्यांना आढळली नाही. त्यांनी इकडेतिकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती कुठेच आढळली नाही. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.................