शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
4
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
5
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
6
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
7
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
8
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
9
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
10
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
11
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
12
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
14
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
15
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
16
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
17
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
18
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
19
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
20
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

फाटकी जीन्स घालणाऱ्या महिलांच्या मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत, भाजपच्या मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 06:41 IST

डेहराडून येथे बालहक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यशाळेचे तीरथसिंह रावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते म्हणाले की, उत्तम संस्कार होत नसल्यामुळे युवा पिढी चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालतात.

डेहराडून : सध्याच्या काळात महिला फाटकी जीन्स घालणे पसंत करतात. त्या आपल्या मुलांवर चांगले संस्कार कसे काय करणार, असे वादग्रस्त उद्गार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी काढले. रावत यांच्या उद्गारांचा देशभरातील महिला नेत्या व विविध पक्षांनी तीव्र निषेध केला आहे. डेहराडून येथे बालहक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यशाळेचे तीरथसिंह रावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते म्हणाले की, उत्तम संस्कार होत नसल्यामुळे युवा पिढी चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालतात. तीरथसिंह रावत हे एकदा विमानप्रवास करत असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या महिलेने गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातली होती व दोन्ही हातात भरपूर बांगड्या घातल्या होत्या. पायात बूट घातले होते. या महिलेसमवेत तिची दोन्ही मुलेही प्रवास करत होती. त्या प्रसंगाचे वर्णन करताना तीरथसिंह रावत म्हणाले की, ही महिला एक स्वयंसेवी संस्था चालविते. गुडघ्यावर फाडलेली जीन्स घालून ही महिला सर्वत्र जात असेल तर त्याचे तिच्या मुलांवर मनावर चांगले संस्कार होणार नाहीत.

कपड्यांवरून कोणालाही जोखू नका : जया बच्चन-     एखाद्याने कोणते कपडे घातले आहेत यावरून त्याची सांस्कृतिक पातळी तुम्ही कशी काय ठरवू शकता, असा खडा सवाल समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना विचारला आहे. -     तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, विमानातील महिला सहप्रवाशाला आपादमस्तक न्याहाळणाऱ्यांकडे आम्ही जेव्हा बघतो त्यावेळी आम्हालाही त्याच्यात एक निलाजरा माणूस दिसू लागतो. -     महिलांच्या कपड्यांकडे पाहून त्यांच्याबाबत मते बनविण्याची सवय तीरथसिंह रावत यांनी बदलली पाहिजे. मुख्यमंत्री विचारपद्धती बदला म्हणजे देश बदलेल, असा टोला शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावला. 

टॅग्स :uttara-kannada-pcउत्तरा कन्नडBJPभाजपाWomenमहिला