शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी करणाऱ्या जोडप्यांची मुले बोलेनात! हातातील मोबाइल दूर ठेवून त्यांच्याशी बोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 05:48 IST

ऑटिज्म डिसऑर्डर सध्या मोठी समस्या बनत आहे. आमच्याकडे सध्या अनेक लहान मुले येत आहेत, ज्यांना एकच शब्द बोलता येतो. - डॉक्टर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्या पती, पत्नी आणि एक मूल अशी परिवाराची व्याख्या बनत चालली असून, याचा परिणाम निष्पाप मुलांवर होत आहे. पती आणि पत्नी हे दोघेही दिवसभर ऑफिसमध्ये आणि नंतर घरी आल्यानंतर सोशल मीडियावर व्यस्त राहत असल्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देत नाहीत. ऑटिज्म डिसऑर्डर सध्या मोठी समस्या बनत आहे. आमच्याकडे सध्या अनेक लहान मुले येत आहेत, ज्यांना एकच शब्द बोलता येतो. आई-वडील त्यांच्यासोबत संवाद साधत नसल्याचा हा मोठा परिणाम आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

मुलांना तुमच्याशी बोलायचेयएकटेपणा मुलांच्या विकासावर परिणाम होत आहे. चार वर्षांची आर्या केवळ काहीच शब्द बोलते; मात्र, तिच्या वयातील इतर मुले पूर्ण वाक्य तयार करू शकतात. अनेक थेरपी करूनही तिच्यामध्ये सध्या सुधारणा होत नाहीये.

डॉक्टरांनी सांगितले की, आर्याला कुणाशीतरी बोलायचे आहे, संवाद साधायचा आहे, त्यासाठी ती वाट पाहत असते; मात्र, तसे होत नसल्याने ती पूर्ण वाक्यही बोलू शकत नाही. 

नोकरीतील सुट्टी आणि तिच्या वयाच्या इतर काही मुलांसोबत सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही समस्या आर्यामध्येच नाही, तर इतर मुलांमध्ये आहे. एलकेजी आणि यूकेजीच्या १० टक्के मुलांमध्ये ही समस्या आहे. त्यामुळे पालकांनी मुलांंशी संवाद साधणे गरजेजे आहे.

आई-वडील आणि मुलगा या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेचा मुलांवर मोठा परिणाम होत आहे. अनेक वेळा मुलांच्या मेंदूचा पूर्ण विकास झालेला नसतो. म्हणून वयानुसार वाढ होत नाही. अशा मुलांची थेरपी लवकरात लवकर सुरू करावी. - डॉ. राकेश मिश्रा, बालरोग तज्ज्ञ

ही आहेत लक्षणे९ महिन्यांच्या बाळाचे नाव ऐकल्यानंतर प्रतिक्रिया न येणेआनंद, दुःख, आश्चर्य, राग यावर व्यक्त न होणे१२ महिन्यांत सामान्य खेळ न खेळता येणेतीन वर्षांपर्यंतचे मूल फक्त एकच शब्द बोलते. जसे दूध, आई, बाबा

काय आहेत कारणे? पालक दोघेही कामावर असल्याने मुलांशी बोलायला कोणीही नसते.गर्भधारणेदरम्यान धोकादायक व्हायरल इन्फेक्शन, आवश्यक घटकांची कमतरता, अमली पदार्थांचे व्यसन किंवा जास्त प्रदूषण.मुले मोबाइल, टीव्ही आदींच्या मदतीने वेळ घालवत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य