Coronavirus: केंद्राचा पुन्हा दिलासा! तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:12 AM2021-06-16T06:12:48+5:302021-06-16T06:13:41+5:30

दुसऱ्या लाटेतही कमी मुले संक्रमित. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दुसऱ्या लाटेत बरीच हानी केलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या नव्या म्युटेशनबाबत तो आता चिंताजनक नाही. मात्र, त्यावर नजर ठेवली जात आहे, असे सांगितले.

Children are not at high risk in the third wave: central government | Coronavirus: केंद्राचा पुन्हा दिलासा! तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका नाही

Coronavirus: केंद्राचा पुन्हा दिलासा! तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका नाही

Next

- नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका मुलांना बसेल ही कथित शंका आरोग्य मंत्रालयाने फेटाळली आहे. मंत्रालयाने मंगळवारी आकडे आणि निष्कर्षांसह हे स्पष्ट केले की, दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत कमी मुले बाधित झाली.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक ते दहा वर्षांची ३.०५ टक्के मुले संक्रमित झाली. पहिल्या लाटेत हेच प्रमाण ३.२८ टक्के होते. दुसऱ्या लाटेत ११ ते २० वयातील ८.०३ टक्के तर पहिल्या लाटेत ८.५ टक्के मुले संक्रमित झाली होती.
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दुसऱ्या लाटेत बरीच हानी केलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या नव्या म्युटेशनबाबत तो आता चिंताजनक नाही. मात्र, त्यावर नजर ठेवली जात आहे, असे सांगितले. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट २०२० च्या तुलनेत जास्त चलाख आहे. त्याला डेल्टा प्लस म्हटले जात आहे. हा जास्त घातक किंवा पसरणारा आहे, अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आता आम्हाला हे बघावे लागेल की आमच्या येथे हा विषाणू कोठे कोठे आहे आणि तो वाढतो आहे की नाही, असे पॉल म्हणाले. 
लसीबाबत पॉल म्हणाले की, “नोवाव्हॅक्सचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. सार्वजनिक पातळीवर उपलब्ध माहितीनुसार ती सुरक्षित आणि खूप प्रभावी आहे. या लसीचे उत्पादन भारतात होईल. क्लिनिकल ट्रायल होत असून त्यात बरीच प्रगती  आहे.”

संक्रमणात
वेगाने घट

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, संक्रमणाचा दर वेगाने कमी होत आहे. २० राज्यांत पाच हजारांपेक्षा कमी रुग्ण आहेत. इतर राज्यांतही सक्रिय रुग्णांत घट होत आहे. 

Web Title: Children are not at high risk in the third wave: central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.