शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

देशातील 5 ते 17 वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका, सर्वेक्षणातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 8:54 AM

राजधानी दिल्लीत 5 ते 17 वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जादा काळजी करावी लागत आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत 5 ते 17 वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जादा काळजी करावी लागत आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात निर्माण झालेली चिंताजनक परिस्थितीती अद्यापही कायम आहे. या साथीमुळे दररोज देशभरात ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, देशातील अनलॉकचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू होण्याची वेळ जवळ आली तरी लोक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. ऑक्सफर्डच्या कोविड - १९ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आजपासून सुरुवात करणार आहे. मात्र, याच सीरमच्या सर्वेक्षणानुसार लहान मुलांपासून युवकांना कोरोनाचा अधिका धोका असल्याचं समोर आलं आहे. 

राजधानी दिल्लीत 5 ते 17 वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जादा काळजी करावी लागत आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे. याच सर्वेक्षणानुसार दिल्लीतील 29.1 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसीत झाल्याचं सांगण्यात आलंय. सर्वेक्षणात 15 हजार नागरिकांचा सहभाग घेण्यात आला होता, त्यामध्ये जवळपास 25 टक्के 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. तर 18 ते 50 वर्षे वयाच्या लोकांची संख्या 50 टक्के होती. उर्वरीत 25 टक्के नागरिकांची संख्या 50 वर्षांपेक्षा अधिक होती.   

सर्वेक्षणानुसार 5 ते 17 वर्षीय मुलांमध्ये 34.7 टक्के कोरोनाचे संक्रमण संवेदनशील आहे. तर, 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये 31.2 टक्केच लोक कोरोना व्हायरसने संक्रमणानंतर बरे झाले आहेत. देशात, 21 ते 50 वर्षीय नागरिकांची कोरोनाबाधित संख्या सर्वाधिक आहे. भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्थेच्या आकड्यांनुसार देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 21 ते 50 वयाचे 61.31 टक्के नागरिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, ही आकडेवारी 21 ऑगस्टपर्यंतची आहे. 

लोकल सुरु करण्याचा विचार, पण...

दरम्यान, अनलॉक-४ च्या टप्प्यात देशातील विविध महानगरांमधील लोकल आणि मेट्रो सेवा तसेच शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र अद्यापही बहुतांश लोक हे लोकल किंवा मेट्रोने प्रवास करण्यास तसेच मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे. लोकल सर्कल्सने केलेल्या सर्वेनुसार ६२ टक्के पालकांनी आपण अद्यापही आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे सांगितले. तसेच केवळ सहा टक्के लोकांना पुढच्या दोन महिन्यांत आपण चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संसर्गाची भीती एवढी आहे की, त्यामुळे ९४ टक्के लोकांनी पुढच्या दोन महिन्यांनंतरसुद्धा चित्रपटगृहात जाण्यास तयार नसल्याचे सांगितले.

ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या चाचणीला सुरुवात

केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास ३ ऑगस्ट रोजी परवानगी दिली होती. या चाचण्या १७ निवडक ठिकाणी करण्यात येत आहेत. यात एम्स दिल्ली, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, पाटणा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील १६०० नागरिक या चाचणीत सहभागी होणार आहेत. ब्रिटनमध्ये पाच ठिकाणी या लसीची दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्याचेही दिसून आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेdelhiदिल्ली