मुले ८० हजार, पुस्तके ५ हजार
By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:28+5:302015-07-19T21:24:28+5:30
लातूर : जिल्ातील अंगणवाडीत ८२ हजार १६६ मुले असून त्यांच्यासाठी केवळ ५ हजार पुस्तके जिल्हा परिषदेने उपलब्ध केले आहेत़ त्यामुळे शिक्षणाच्या मुळ प्रवाहात येणार्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे गैरसोय होणार आहे़

मुले ८० हजार, पुस्तके ५ हजार
ल तूर : जिल्ातील अंगणवाडीत ८२ हजार १६६ मुले असून त्यांच्यासाठी केवळ ५ हजार पुस्तके जिल्हा परिषदेने उपलब्ध केले आहेत़ त्यामुळे शिक्षणाच्या मुळ प्रवाहात येणार्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे गैरसोय होणार आहे़ लातूर जिल्ातील चिमुकल्यांनी शिक्षणाच्या मुळ प्रवाहात यावे, या दृष्टीकोनातून २४०८ अंगणवाड्यातील ० ते ६ वयोगटातील १ लाख ७७ हजार विद्यार्थ्यांना मराठी शिक्षणाबरोबरच आर्ली चाईल्ड केअर एज्युकेशन चालू वर्षापासून दिले जाणार आहे़ याबाबत एकात्मिक बाल विकास योजनेच्या मुंबई आयुक्त वनिता सिंघन यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ातील अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस व सुपरवायझर यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे़ पहिल्या टप्प्यात पुण्यातील यशोदा संस्थेमार्फत अंगणवाडींच्या सुपरवायझरला प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ त्यानंतर कार्यकर्ती मदतनीस प्रशिक्षण घेऊन त्या-त्या जिल्ातील अंगणवाडी कार्यकर्तींना प्रशिक्षण देणार आहेत़ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट २०१५ पासून रितसर पद्धतीने ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांना अंगणवाडीतून एबीसीडीचे धडे दिले जाणार आहेत़ अंगणवाडीच्या अभ्यासक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून ८२ हजार १६६ विद्यार्थ्यांसाठी ५ हजार पुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे़ एकूण १ लाख ७७ विद्यार्थी असले तरी प्रत्यक्षात येणारे ८२ हजार १६६ विद्यार्थी असल्याने त्यांना इंग्रजी, मराठी पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून एबीसीडीचे धडे दिले जाणार आहेत़ स्पर्धेतील टिकावासाठी इंग्रजी शिक्षण़़़ लातूर जिल्ातील इंग्रजी शाळांना जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या इंग्रजी शाळांमुळे घटत आहे़ त्यामुळे स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी अंगणवाडीतही एबीसीडीचे धडे देण्याचे नियोजन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कांगणे यांनी सांगितले़