मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या
By Admin | Updated: November 11, 2014 02:18 IST2014-11-11T02:18:04+5:302014-11-11T02:18:04+5:30
मुलाला मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिल्याने त्या मुलाने कीटकनाशक प्राशन करून जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली.

मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या
बहरामपूर : मोबाईलच्या वेडापायी जीव देण्याचा वेडेपणा एका शाळकरी मुलाने येथे केला. प. बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्हय़ातील तेंतुलिया गावात राहणा:या एका शेतक:याने मुलाला मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिल्याने त्या मुलाने कीटकनाशक प्राशन करून जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली.
या भागात राहणा:या मबीबूल सरकारच्या घरी दोन सामान्य पद्धतीचे मोबाईल हँडसेटस् होते. मात्र, त्याच्या आठवीत शिकणा:या मसूद सरकार या 15 वर्षाच्या मुलाला टचस्क्रीन पद्धतीचा मोबाईल हवा होता. हा मोबाईल महाग असल्याकारणाने त्याच्या वडिलांनी तो घेण्यास नकार दिला होता. या नकाराने क्षुब्ध होऊन रात्रीच्या वेळी मसूदने कीटकनाशक औषध खाल्ले. (वृत्तसंस्था)