आईने टिव्ही बघायला मनाई केल्याने मुलाची आत्महत्या
By Admin | Updated: June 20, 2017 12:22 IST2017-06-20T10:32:35+5:302017-06-20T12:22:42+5:30
आई टिव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या मुलाने आपलं जीवन संपवल आहे.

आईने टिव्ही बघायला मनाई केल्याने मुलाची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. 20- आई टिव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या मुलाने आपलं जीवन संपवल आहे. या 10 वर्षाच्या मुलाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरपूरमध्ये सोमवारी ही धक्कादायक घटना घडली होती. आईने तिच्या दहा वर्षाच्या मुलाला टिव्ही बघायला मनाई केली होती तसंच रिमोटचे सेल काढून शेजाऱ्यांकडे दिले होते. सेल शेजाऱ्यांकडे देऊन त्या मुलाची आई कामावर निघून गेली. त्यानंतर तो मुलगा घरी एकटाच होता. थोड्या वेळाने आईने शेजारच्या महिलेला रिमोटचे सेल मुलाला देऊन यायला सांगितलं होतं. जेव्हा शेजारची बाई मुलाला सेल द्यायला आली तेव्हा तिने त्या मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर त्या महिलेने पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सेक्टर 39 च्या पोलिसांना त्या मुलाला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
बिहारच्या दरभंगातील सेक्टर ६६ मध्ये अभय आनंत राहतात. त्यांचा १० वर्षांचा मुलगा ओम सहावीत शिकत होता. शाळा सुरू झाली नव्हती त्यामुळे सोमवारी ओम घरीच होता. सकाळपासून तो टिव्ही पाहत होता. त्यामुळे आई अंजुने त्याला टिव्ही पाहण्यास मनाई केली. पण तो हट्ट करत होता. म्हणून तिने रिमोटचे सेल काढून शेजारी राहणाऱ्या नातेवाईक महिलेकडे दिले. त्यानंतर आई कामावर निघून गेली. त्या मुलाची आई दरभंगातील सेक्टर 45 मध्ये एका प्ले ग्रुपमध्ये काम करते. कामावर गेल्यानंतर अर्ध्या तासाने अंजुने आपल्या त्या शेजारणीला फोन करून ओमला रिमोटचे सेल देऊन यायला सांगितलं. पण ती शेजारीण घरी आल्यावर तिला ओम पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. आपल्या आईची ओढणी घेऊन त्याने गळफास घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुट्टी असूनही आई टिव्ही बघू देत नाही म्हणून हा मुलगा नाराज होता आणि त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं, अशी माहिती दगभंगा सेक्टर 39 चे एसओ अजय कुमार सिंह यांनी दिली आहे.