भाईंदरमधील औद्योगिक वसाहतीत राबतात बालमजूर; कायद्याची एैशी-तैशी
By Admin | Updated: May 25, 2014 00:17 IST2014-05-25T00:17:36+5:302014-05-25T00:17:36+5:30
भाईंदर : कायद्याने लहान मुलांना कामावर ठेवणे गुन्हा ठरत असला तरी या कायद्याची एैशी-तैशी करून येथील औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योगांत लहान मुलांनाच बालमजुराचे काम देण्यात येत असल्याचे उजेडात आले आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासनासह बालमजुरांसाठी राबणार्या सामाजिक संस्था व कामगार न्याय निरीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.

भाईंदरमधील औद्योगिक वसाहतीत राबतात बालमजूर; कायद्याची एैशी-तैशी
भ ईंदर : कायद्याने लहान मुलांना कामावर ठेवणे गुन्हा ठरत असला तरी या कायद्याची एैशी-तैशी करून येथील औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योगांत लहान मुलांनाच बालमजुराचे काम देण्यात येत असल्याचे उजेडात आले आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासनासह बालमजुरांसाठी राबणार्या सामाजिक संस्था व कामगार न्याय निरीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. बालमजुरांना कामाचा कमी मोबदला द्यावा लागत असल्याने अनेक उद्योगांतील मालकांच्या वेतनाची मोठ्या प्रमाणात बचत होत असते. त्यामुळेच हलकी कामे त्यांच्याकडून करून घेतली जात असल्याचे एका उद्योगाच्या मालकाकडून सांगण्यात आले. बालमजूर प्रकरणी शासकीय यंत्रणेची धाड जरी पडत असली तरी त्यातील गुन्हेगार मालक मात्र संबंधित यंत्रणेच्या अधिकार्यांशी तडजोड करून मोकळे सुटतात. परंतु त्या धाडीतून ताब्यात घेण्यात आलेल्या लहान मुलांना मात्र बालसुधारगृहात धाडून त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच केला जात असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.(फोटो - २४भाईंदर बालमजूर)