शेतातील बंधार्यात बुडून बालिकेचा मृत्यू हृदयद्रावक : उमाळे परिसरातील घटना; एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद
By Admin | Updated: July 16, 2016 00:38 IST2016-07-16T00:38:47+5:302016-07-16T00:38:47+5:30
जळगाव : शेतातील बंधार्यात बुडून दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास उमाळे, ता.जळगाव शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेतातील बंधार्यात बुडून बालिकेचा मृत्यू हृदयद्रावक : उमाळे परिसरातील घटना; एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद
ज गाव : शेतातील बंधार्यात बुडून दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास उमाळे, ता.जळगाव शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रवीना बळीराम पटेल (वय २ वर्ष, रा.उमाळे) असे मृत्यू पावलेल्या बालिकेचे नाव आहे. रवीनाचे वडील बळीराम पटेल हे उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबत उमाळे परिसरात आलेले आहेत. ते धनंजय हरचंद महाजन (रा.उमाळे) यांच्या शेतात जागल्या म्हणून कामाला आहेत. शुक्रवारी सकाळी ते धनंजय महाजन यांच्या शेतातील फळबागेत मशागतीसाठी निघून गेले. रवीना व तिची मोठी बहीण या दोघीही घराशेजारीच खेळत होत्या. तिची आई बायलीबाई यांच्या पायाला दुखापत झालेली असल्याने त्या घरात झोपलेल्या होत्या. खेळता-खेळता रवीना एकटी शेताजवळ असलेल्या बंधार्यात उतरली. बंधार्याची खोली जास्त असल्याने त्यात ती बुडाली. काही वेळेनंतर बायलीबाई या कपडे धुण्यासाठी त्याच बंधार्यावर गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमले. त्यांनी रवीनाला बंधार्याच्या पाण्यातून बाहेर काढले. नेरीच्या दवाखान्यात हलविलेधनंजय महाजन, बळीराम पटेल यांनी रवीनाला लागलीच नेरी येथील दवाखान्यात हलविले. परंतु तिचा श्वासोच्छ्वास व हृदयाची क्रिया थांबलेली असल्याने तेथील डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. म्हणून रवीना घेऊन महाजन व पटेल हे लागलीच जिल्हा रुग्णालयात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकार्यांनी रवीनाला मृत घोषित केल्याचे ऐकल्यानंतर बायलीबाई व इतर नातेवाइकांनी हंबरडा फोडला. याप्रकरणी डॉ.भंगाळे यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.