शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बालवयातील गुन्हा चारित्र्यावर कलंक नव्हे - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:14 IST

रमेश बिश्नोई या राजस्थानमधील तरुणाच्या प्रकरणात हा निकाल दिला गेला.

नवी दिल्ली : अल्पवयीन असताना केलेल्या फौैजदारी गुन्ह्याबद्दल एखाद्यास शिक्षा झाली असली तरी तो त्याच्या चारित्र्यावर कलंक ठरत नाही. बालगुन्हेगार म्हणून झालेल्या शिक्षेमुळे ती व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरत नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.न्या. उदय उमेश लळीत आणि न्या. विनीत सरन यांनी म्हटले की, नैतिक अध:पतन म्हणावे, अशा गुन्ह्याचा आरोप असणे व त्यासाठीची शिक्षा ही सरकारी नोकरीसाठी अपात्रता असते. मात्र, बालगुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्यास ही अपात्रता लागू होत नाही. बालगुन्हेगार म्हणून एखाद्यास शिक्षा झाली तरी त्याचे पूर्वचारित्र्य पूर्णपणे पुसून टाकण्याची स्पष्ट तरतूद बालगुन्हेगारी कायद्यात आहे.न्यायालय म्हणते की, बालगुन्हेगारांना पूर्वचारित्र्य पुसून कोऱ्या पाटीने नवे आयुष्य जगता यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून जबाबदार नागरिक म्हणून जगता यावे हा बालगुन्हेगारी कायद्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे बालवयातील गुन्हेगारी ही सरकारी नोकरीसाठी अपात्रता मानणे हे कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासण्यासारखे आहे.रमेश बिश्नोई या राजस्थानमधील तरुणाच्या प्रकरणात हा निकाल दिला गेला. रमेश यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआरपीएफ) एक महिन्यात उपनिरीक्षकपदी नियुक्ती करावी, असा आदेशही दिला गेला. सीआरपीएफने २०१५ मध्ये उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात दिली. लेखी परीक्षा, मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीच्या आधारे रमेश यांची निवड झाली. त्यांना नियुक्तीपत्रही दिले. नेमणुकीवर रुजू होण्याआधी त्यांनी एक फॉर्म भरून दिला. त्यात त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी मुलीची छेड काढणे व तिचा हात पकडणे याबद्दल गुन्हा नोंदवून आपल्यावर खटला दाखल केला गेला होता, असे प्रामाणिकपणे नमूद केले.मुलीने व तिच्या पालकांनी आपल्याला माफ करायचे ठरवून कोर्टात साक्ष दिली नाही. परिणामी, आपली निर्दोष मुक्तता केली. असेही त्याने नमूद केले; पण ते निर्दोष ठरले असले तरी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता, या मुद्यावर रमेश यांना नोकरीसाठी अपात्र ठरविले.हायकोर्टाचा निकालही रमेशच्या बाजूनेयाविरुद्ध दाद मागितली असता, राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्याविरुद्ध केंद्र सरकारचे अपील द्विसदस्यीय खंडपीठाने फेटाळले. त्यामुळे सरकार सर्वोच्च न्यायालयात आले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय