मुख्यमंत्री करणार दक्षिणचे समाधान
By Admin | Updated: July 19, 2015 21:34 IST2015-07-19T21:34:54+5:302015-07-19T21:34:54+5:30

मुख्यमंत्री करणार दक्षिणचे समाधान
>- २ ऑगस्टला शिबिर : तक्रारी स्वीकारण्याचा आज अंतिम दिवसनागपूर : नागरिकांच्या समस्या व प्रशासकीय पातळीवर रखडलेली कामे करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पहिले समाधान शिबिर घेतल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे दुसरे समाधान शिबिर २ ऑगस्ट रोजी दक्षिण नागपुरातील मतदारांसाठी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमाननगर येथे होत आहे. या शिबिरासाठी तक्रारी देण्यासाठी २० जुलै ही अंतिम तारीख आहे.शिबिरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. या शिबिराची माहिती दक्षिण नागपुरातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी रविवारी आ. सुधाकर कोहळे यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत जाऊन त्यांचे अर्ज दाखल करून घेण्याचे आवाहन केले. आ. सुधाकर कोहळे यांनी सांगितले की, नागरिकांना वैयक्तिक तक्रारी सोडविण्याची ही संधी आहे. शिबिरात २५ ते ३० विभागाचे स्टॉल राहतील. यासाठी अर्ज करण्याची सोमवारी अंतिम मुदत आहे. नागरिकांनी महापालिकेच्या हनुमाननगर व नेहरूनगर झोनमध्ये जाऊन तीन प्रतीत तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन कोहळे यांनी केले. चौकट...असा करा अर्ज- अर्ज तीन प्रतीत करावा- एका अर्जात एकाच विभागाशी संबंधित तक्रार असावी- नोकरी- बदली संदर्भात अर्ज करू नये- न्यायप्रविष्ट प्रकरणांचे अर्ज करू नये