नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
By Admin | Updated: January 12, 2015 00:11 IST2015-01-12T00:11:20+5:302015-01-12T00:11:20+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ८ नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची येत्या १३ जानेवारीला बैठक बोलावली आहे.

नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
नवी दिल्ली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ८ नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची येत्या १३ जानेवारीला बैठक बोलावली आहे. राज्यांच्या सार्वजनिक विभागांतर्फे रस्ते बांधणीच्या कामाला गती देण्यातील अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीला छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)