शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलचे नेटवर्क गायब झाले! पोलिसांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना मध्यरात्री उचलून नेले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:05 IST

अत्यंत महत्त्वाचं काम असताना मोबाइल नेटवर्क गायब झाल्याचा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल.

ठळक मुद्देराजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली होती.त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.दरम्यान, सीएमओने या घटनेला दुजोरा दिलेला नाही. मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कृतीचा निषेध केला आहे.

रांची - अत्यंत महत्त्वाचं काम असताना मोबाइल नेटवर्क गायब झाल्याचा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल. असाच अनुभव झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना आला. राजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास हे सोमवारी रात्री राजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्या, मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर तातडीने कार्यरत झालेल्या पोलिसांनी बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. अखेरीस पहाटे तीन वाजता या अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. राजभवनात थांबलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलला नेटवर्क न आल्याने दुमका येथील टेलिकॉम जिल्हा व्यवस्थापक पी. के. सिंह आणि सहाय्यक ज्युनिअर टेलिकॉम अधिकारी यांना शिक्षा म्हणून तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. या दोन्ही अधिकाऱ्यांना मध्यरात्री उशिरा अटक करण्यात आली होती. दरम्यान, सीएमओने या घटनेला दुजोरा दिलेला नाही. मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कृतीचा निषेध केला आहे. तसेच ही कारवाई म्हणजे मुख्यमंत्र्यांचे फॅरिस्ट विचार आहेत, ''असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. केवळ मुख्यमंत्र्यांच्या मोबइलला नेटवर्क आले नाही म्हणून या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. ही बाब मुख्यमंत्र्यांती फॅसिस्ट विचारसरणी अधोरेखित करते.'' असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बीएसएनएल कर्मचारी संतप्त झाले आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकार