शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

Hathras case: "सर्व नमुन्यांची होतेय पोलखोल, हाथरसमध्ये कुठल्याही प्रकारचे कारस्थान यशस्वी होणार नाही"

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 7, 2020 16:53 IST

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही. (yogi adityanath)

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात दंगल घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग'एक्सप्रेस वे ते एअरपोर्टपर्यंत होतोय यूपीचा विकास'समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, म्हणून कट-कारस्थान

लखनौ - हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक हाथरस प्रकरणावरून राजकारण करत आहेत. कट-कारस्थान केले जात आहेत. कट-कारस्थानासाठी परदेशातून फंडिंग करण्यात आली. मात्र, हे कट-कारस्थान कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही.

विरोधक राज्यात दंगलीची स्वप्न बघतायत, आंतरराष्ट्रीय फंडिंगने कट-कारस्थान; योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात दंगल घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग -हाथरस प्रकरणासंदर्भात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवून आणण्यासाठी फंडिंग करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर ही फंडिंग मॉरिशसमधून झाली असल्याचे ईडीने म्हटले आहे. यावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, जनतेच्या विश्वासाशी खेळ खेळण्याची मुभा कुणालाही दिली जाणार नाही. 

'एक्सप्रेस वे ते एअरपोर्टपर्यंत होतोय यूपीचा विकास' -योगी आदित्यनाथ म्हणाले, समाजात द्वेष भावना निर्माण करून विकासात अडचणी निर्माण करण्याची काही लोकांची इच्छा आहे. विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश वेगाने पुढे जात आहे. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात केवळ दोनच एक्सप्रेस वे होते. आमचे सरकार आल्यापासून तीन वर्षात तीन नवे एक्सप्रेस वे तयार होत आहेत. 2014पर्यंत उत्तर प्रदेशात केवळ दोनच विमानतळं कार्यरत होती. आता 7 विमानतळं कार्यरत आहेत. तर 12 नव्या एयरपोर्टवरील काम सुरू झाले आहे.

Hathras Gangrape: आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, यूपी पोलीस अन् सरकारवरही विश्वास नाही; पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, म्हणून कट-कारस्थान -योगी म्हणाले, या लोकांना हितकारक, समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत. विकासाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत, म्हणून आता, अशा प्रकारचे कट-कारस्थान आखत आहेत. मात्र, आता या नमुन्यांची पोलखोल होत आहे. यांचे कारस्थान जनतेसमोर येत आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस