मुख्यमंत्र्यांनी ३० हजार शेतकऱ्यांशी साधला संवाद

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:43+5:302015-09-03T23:05:43+5:30

मराठवाड्यातील स्थितीची पाहणी : ५ जिल्‘ांना दिली भेट

Chief Minister interacted with 30,000 farmers | मुख्यमंत्र्यांनी ३० हजार शेतकऱ्यांशी साधला संवाद

मुख्यमंत्र्यांनी ३० हजार शेतकऱ्यांशी साधला संवाद

ाठवाड्यातील स्थितीची पाहणी : ५ जिल्ह्यांना दिली भेट

सूचना : डेटलाईन सोयीनुसार बदलून घेणे

नागपूर : मराठवाड्यातील टंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तीन दिवस मराठवाड्याचा दौरा केला. या तीन दिवसांत त्यांनी पाच जिल्ह्यांना भेटी देऊन सुमारे ३० हजार शेतकऱ्यांशी संवाद साधला व नेमकी परिस्थिती जाणून घेतली.
मराठवाड्यातील काही भागांत अपुऱ्या पावसामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसात ७५० किलोमीटरचा प्रवास केला. यादरम्यान त्यांनी लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यांतील ३१ गावांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी नेमक्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय पाच जिल्ह्यांतील पीक परिस्थिती, चारा छावण्या, जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा त्यांनी आढावा घेत असताना शासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या मदतीच्या उपाययोजनांची माहिती घेतली.

Web Title: Chief Minister interacted with 30,000 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.