शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या विकासात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे उत्तम कार्य; डॉ. विजय दर्डा यांनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 07:57 IST

‘रायझिंग राजस्थान इन्व्हेस्टमेंट समिट’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी दर्शविलेल्या कटिबद्धतेबद्दल मुख्यमंत्री शर्मा यांचे दर्डा यांनी अभिनंदन केले.

जयपूर : ‘लोकमत मीडिया समूहा’चे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची शुक्रवारी जयपूरमध्ये भेट घेतली. ‘रायझिंग राजस्थान इन्व्हेस्टमेंट समिट’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी दर्शविलेल्या कटिबद्धतेबद्दल मुख्यमंत्री शर्मा यांचे दर्डा यांनी अभिनंदन केले.

राजस्थानमध्ये जलपुरवठा आणि सिंचन यासाठी राज्य सरकारने केलेली विकासकामे तसेच जलस्रोतांची उपलब्धता वाढविणे, विद्युत उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी राजस्थान सरकारने केलेल्या प्रभावी उपाययोजनांबद्दलही या भेटीत चर्चा झाली. 

आठवणींना उजाळा‘प्रवासी’ राजस्थानी नागरिकांच्या आपल्या मातृभूमीबद्दल असलेल्या नितांत प्रेमाविषयी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या भेटीत प्रशंसोद्गार काढले. जळगाव येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात राजस्थानी नागरिकांनी दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी प्रवासी राजस्थानी दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या कार्यक्रमाकरिता केलेल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या आठवणी शर्मा यांनी या भेटीत डॉ. विजय दर्डा यांना सांगितल्या.

मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले की, राजस्थान सरकारने प्रवासी राजस्थानी नागरिकांसाठी एक स्वतंत्र खाते स्थापन केले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची जनहिताच्या कार्यासाठी असलेली कटिबद्धता व सामान्य लोकांबद्दल असलेली आपुलकी या गोष्टींची डॉ. विजय दर्डा यांनी प्रशंसा केली.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाRajasthanराजस्थान