शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात नाश्त्यामध्ये ब्रेड, बघायला TV अन्...; CM केजरीवालांना तिहारमध्ये असे घालवावे लागतील 14 दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:41 IST

महत्वाचे म्हणजे, तिहारमध्येच वेगवेगळ्या कारागृहात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन देखील कैद आहेत.

आम आदमी पक्षाच्या (आप) अडचणी थांबण्याचे नाव नाही. आपचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी, आपचे तीन मोठे नेतेही तिहार कारागृहात आहेत. सीएम केजरीवाल यांना जामीन मिळाला नाही तर, त्यांनाही पुढील 14 दिवसांसाठी तिहार कारागृहातच रहावे लागणार आहे. त्यांना ईडीने 21 मार्चला अटक केली होती. अटक झाल्यापासून ते ईडीच्या कोठडीत होते. आता, केजरीवाल यांना तिहार कारागृह क्रमांक दोनमध्ये एकटे राहावे लागणार आहे. या कालावधीत त्यांना नाश्त्यात चहा आणि ब्रेड दिली जाईल. तसेच जेवणात पाच पोळ्या (चपात्या) दिल्या जातील.

तिहारमध्ये केजरीवालांना असे घालवावे लागणार 14 दिवस -तिहारमध्ये इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच अरविंद केजरीवाल यांची सकाळही 6:30 वाजल्यापासून होईल 'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांना नाश्त्यात चहा आणि ब्रेड दिले जाईल. सकाळी अंघोळीनंतर, केजरीवालांना न्यायालयात जायचे असेल तर, परवानगी दिली जाईल. या काळात ते आपल्या कायदे विषयक टीम सोबत चर्चाही करू शकतील. तिहारमध्ये त्यांना सकाळी 10:30 ते 11 दरम्यान भोजन मिळेल. यात दाळ, भाजी, पाच पोळ्या (चपाती) आणि भाताचा समावेश असेल.

याशिवाय केजरीवाल यांना इतर कैद्यांप्रमाणे, दुपारी 3.30 वाजता एक कप चहा आणि त्यासोबत दोन बिस्किट्स दिले जातील. सायंकाळी 4 वाजता आपल्या वकीलांना भेटायची परवानगी दिली जाईल. तिहारमध्ये रात्रीचे भोजन सायंकाळी साडे पाच वाजल्यापासूनच सुरू होईल. रात्रीही भोजनात, दाळ, भाजी, पोळी आणि भात मिळेल. महत्वाचे म्हणजे, तिहारमध्येच वेगवेगळ्या कारागृहात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन देखील कैद आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालjailतुरुंगCourtन्यायालयAam Admi partyआम आदमी पार्टी