भगवत्गीतेचे महत्त्व जगाने मान्य केले मुख्यमंत्री : राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:34+5:302015-02-15T22:36:34+5:30

नागपूर : भगवत्गीतेचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गीता भेट देणे यातच या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

Chief Minister accepted the significance of Bhagwatgate: The conclusion of the National Seminar | भगवत्गीतेचे महत्त्व जगाने मान्य केले मुख्यमंत्री : राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

भगवत्गीतेचे महत्त्व जगाने मान्य केले मुख्यमंत्री : राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

गपूर : भगवत्गीतेचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गीता भेट देणे यातच या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतर्फे आयोजित भगवत्गीतेवरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव दत्ताजी टेकाडे, सहसचिव मेघा नांदेडकर, प्राचार्य संध्या नायर, प्रा.राजीव हडप, डॉ. सुधाकर इंगळे व वाणिज्य विभागप्रमुख राजीव आष्टेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,जगातील अनेक संस्कृती काळाच्या ओघात लोप पावल्या. पण भारतीय संस्कृती वेगवेगळे आक्रमणे झाल्यानंतरही जिवंत राहिली. कारण तिचे शाश्वत मूल्य भक्कम होते. त्यामुळे आपली संस्कृती इतरांवर थोपविण्याची कधी गरजच भासली नाही. गीता नुसता धर्म नाही. यात व्यवस्थापनाचे शास्त्र दडले आहे. जगानेही ही बाब वेगवेगळ्या माध्यमातून मान्य केली आहे. गीतेचा सार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
यावेळी प्राचार्य संध्या नायर यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन प्रा. गोविंद भट्टा यांनी केले. प्रतिनिधींच्यावतीने अमिता डिसोझा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी योगानंद काळे, आर.एल. देशपांडे, व्ही.जी. शास्त्री, प्रभुजी देशपांडे, वामनराव जोशी, भालचंद्र देशपांडे, राजीव हडप, डॉ. सुधाकर इंगळे, वंदना व श्रीनिवास वर्णेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विशाखा जोशी यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. संदीपा सुरजुसे यांनी मानले. विद्या बोरकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची संागता झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister accepted the significance of Bhagwatgate: The conclusion of the National Seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.