शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीशपदी, शपथविधी हाेताच न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे राष्ट्रध्वजाला वंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 06:18 IST

राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीत देवाच्या नावाने शपथ घेतली.

नवी दिल्ली :

अयोध्या जमीन विवाद प्रकरणासह अनेक ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा भाग असलेले न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी बुधवारी भारताचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीत देवाच्या नावाने शपथ घेतली.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्याकडून सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.  न्यायमूर्ती  चंद्रचूड वयाच्या ६५ वर्षापर्यंत अर्थात १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत या पदावर असतील. पदग्रहण समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, किरेन रिजिजू व मावळते सरन्यायाधीश लळित उपस्थित होते. ११ ऑक्टोबर रोजी लळित यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली. १७ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची ५०वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली होती. 

माझ्यासाठी मोठी संधी आणि जबाबदारीही सामान्य लोकांची सेवा करणे यालाच माझे प्राधान्य आहे. मी देशातील सर्व नागरिकांसाठी काम करीन, मग ते तंत्रज्ञानातील असो किंवा नोंदणी क्षेत्रातील; मी प्रत्येक बाबतीत नागरिकांची काळजी घेईन. न्यायपालिकेचे नेतृत्व करणे, ही एक मोठी संधी आणि जबाबदारी आहे. मी केवळ शब्दांतून नव्हे तर माझ्या कामातून नागरिकांचा विश्वास संपादन करीन.     - धनंजय यशवंत चंद्रचूड,     सरन्यायाधीश

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय