शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेवर टीका करणं सोपं, सुधारणा घडवणं कठीण- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 17:46 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नोंदवलेल्या आक्षेपांवर सरन्यायाधीशांचं भाष्य

नवी दिल्ली: कोणत्याही संस्थेवर टीका करणं सोपं असतं. मात्र त्या संस्थेत सुधारणा घडवून आणणं अवघड असतं, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जानेवारी महिन्यात पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीशांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवले होते. न्यायाधीशांच्या त्या बंडावर सरन्यायाधीशांनी अखेर सात महिन्यांनी भाष्य केलं आहे. कोणत्याही संस्थेवर टीका करणं किंवा ती संस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करणं सोपं आहे. मात्र वैयक्तिक आशा-अपेक्षा दूर ठेवून त्या संस्थेच्या सुधारणांसाठी झटणं कठीण असतं, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मिश्रा बोलत होते. 'कोणत्याही संस्थेला पुढे नेण्यासाठी सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय आवश्यक असतात. परिपक्वता, जबाबदारीचं भान आणि धैर्य असेल, तरच एखादी संस्था नव्या उंचीवर पोहोचू शकते,' असं मिश्रा म्हणाले. 12 जानेवारी 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी (न्यायमूर्ती चेलमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ) पत्रकार परिषद घेतली होती. या न्यायमूर्तींनी पत्रकारांशी संवाद साधताना सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते. लोकशाही धोक्यात असल्याची भावना या चारही न्यायाधीशांनी बोलून दाखवली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ होती. 

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालय