शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर राजकीय पक्षांकडून EVM ला बळीचा बकरा बनवलं जातंय - मुख्य निवडणूक आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 11:42 IST

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम मशीनबाबत गेल्या काही काळापासून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी...

नवी दिल्ली -  लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम मशीनबाबत गेल्या काही काळापासून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणुकीत पराभूत होणारे पक्ष  आणि उमेदवार इव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप सर्रास करतात.  त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी राजकीय पक्षांकडून पराभवानंतर इव्हीएमला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्याची शक्यता फेटाळून लावताना रावत म्हणाले. पराभव सहन करू न शकणाऱ्या राजकीय पक्षांना पराभवाचे खापर फोडण्यासाठी कुणाची तरी गरज असते. अशाच राजकीय पक्षांकडून इव्हीएमला बळीचा बकरा बनवले जात आहे.  कुणावर तरी पराभवाचे खापर फोडत असतात.इव्हीएममधील गडबडीबाबत विचारले असता रावत म्हणाले, " जेव्हा जेव्हा असे आरोप करण्यात आले तेव्हा प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाने आपले मत मांडले आहे. आगामी काळात सर्व निवडणुका इव्हीएमने होतील आणि सर्व इव्हीएमला  व्हीव्हीपँटची सुविधा असेल, त्यामुळे आपण आपण दिलेले मत योग्य उमेदवाराला मिळाले आहे की नाही हे मतदाराला समजू शकेल,  असा निर्णय गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता." मात्र लोकसभा निवडणूक लवकर घेण्याविषयी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे संकेत मिळाले नसल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.  नियमानुसार निवडणूक आयोग कुठल्याही सभागृहाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी सहा महिने आधीच निवडणुकीची अधिसूचना  काढू शकतो. ही निवडणूक आयोगावर असलेली कायदेशीर मर्यादा आहे. त्याचा पलिकडे जाऊन आम्ही काम करू शकत नाही." " 2015 साली केंद्र सरकाने राज्य आणि केंद्राची निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यासाठी घटनेमध्ये बदल आणि कायद्यांमध्ये काही फेरबदल करण्याची गरज आहे. त्यामुळे यासंदर्भात आम्ही सरकारला काही सल्ले दिले होते. पण त्यानंतर आम्हाला अधिक माहिती मिळालेली नाही." असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुढे सांगितले.  

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारतPoliticsराजकारण