नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून आंशिक दिलासा मिळाला. आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदम्बरम यांना आता तिहार तुरुंगात न पाठविता घरीच नजरकैदेत ठेवण्याची त्यांची विनंती मान्य करण्यात आली.आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीनाची मागणी चिदम्बरम यांच्याकडून करण्यात आलेली आहे. यावर कनिष्ठ न्यायालयाने निर्णय द्यावा आणि कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना घरीच स्थानबद्ध करण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत.
चिदम्बरम यांची तिहार जेलमध्ये रवानगी नाही - सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 07:19 IST