शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

CM बघेल यांनी RSSची तुलना नक्षलवाद्यांशी केल्यानं वाद, प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी दिलं थेट प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 9:19 AM

"गेल्या 96 वर्षांत संघाची नोंदणी, बायलॉज, सदस्यता सूची कुठे आहे, हे विचारण्याची आपली हिंमत आहे? भीती वाटते, की आपल्या सारखी अवस्था इतर जहालमतवाद्यांची न होवो?”

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची (आरएसएस) तुलना नक्षलवाद्यांशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर भोपाळच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर (Pragya Singh Thakur) यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यवर पलटवार केला आहे. प्रज्ञा सिंह ठाकुर बुधवारी म्हणाल्या, आज हिंदू आणि देश हा आरएसएसमुळेच सुरक्षित आहे. (Pragya Thakur On RSS)

हा तर देशाचा अपमान - काँग्रेस प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर, त्यांचे वक्तव्य म्हणजे, भारतीय सैनिकांचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यासंदर्भात, काँग्रेस नेते के. के. मिश्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की “प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मते आरएसएसमुळे देश सुरक्षित आहे! मग आपल्या सीमेवर उभे असलेले सर्व धर्मांच्या रेजिमेंटचे शूर आणि शहीद सैनिक भ्याड आणि देशद्रोही आहेत? गेल्या 96 वर्षांत संघाची नोंदणी, बायलॉज, सदस्यता सूची कुठे आहे, हे विचारण्याची आपली हिंमत आहे? भीती वाटते, की आपल्या सारखी अवस्था इतर जहालमतवाद्यांची न होवो?”

मोहन भागवत म्हणाले होते, वीर सावरकरांची छबी खराब करण्याचा प्रयत्न -तत्पूर्वी, सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, आजही भारतात वीर सावरकरांसंदर्भात माहितीचा अभाव आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की, राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांबद्दल बोलू नका. हिंदुत्वाचे सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ