शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीच्या खात्यात दर महिन्याला पैसे पाठवतेय सरकार! एवढे रुपये होतायत जमा; बघा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 18:54 IST

भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले, ""छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे काँग्रेस भयभित आहे. म्हणून अशी विधाने करत आहे. ते म्हणाले, बस्तर भागात एक विसंगतीचे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीच्या नावाने पैसे काढले जात आहेत. याची चौकशी केली जाईल.

'महतारी वंदन योजना' ही छत्तीसगडसरकारची एक गेमचेन्जर योजना मानली जाते. मात्र, यात मोठी गडबड होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचेही नाव समाविष्ट झाले आहे. यावरून आता राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, चुकीच्या नावावर निधी वर्ग केला जात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सनी लिओन नावाच्या लाभार्थीच्या खात्यात दरमहिन्याला 1000 रुपये जात आहेत.

बस्तरमधील प्रकरण -हे प्रकरण राज्यातील बस्तर भागातील आहे. येथे महतारी वंदन योजनेचा लाभ सनी लियोन घेत आहे. (बॉलीवुडमध्ये सनी लिओनी नावाची एक चर्चित अभिनेत्रीही आहे.) सरकारच्या महतारी वंदन योजनेच्या वेबसाइटवर याच नावाने लाभार्थाची नोंद आहे. वेबसाइटवर नोंदणी क्रमांक MVY006535575 प्रविष्ट केल्यावर, लाभार्थ्याचे नाव सनी लिओन असे दिसते, तर तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स दिसते. योजना सुरू झाल्यापासून, लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1,000 रुपये जमा झाले आहेत.

काँग्रेसनं सरकारला घेरलं - खोटी नावे समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेसाध्यक्ष दीपक बैज यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, छत्तीसगड सरकार महतारी वंदन योजनेत माता-भगिनींच्या नावाने मोठा गोलमाल करत आहे, हे आम्हाला आधीपासूनच वाटत होते. कोन आहे ही सनी लिओन जिच्या कात्यावर पैसे जात आहेत? कोण आहे याचा सूत्रधार या चौकशीचा विषय आहे. तसेच, करीना कपूरच्या नावाने देखील पैसातर जात नाहीय, याचाही तपास सरकारने करायला हवा. महतारी वंदनच्या नावाने मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यामुळेच अशा प्रकारची प्रकरणे समोर येत आहेत.

भाजपचा पलटवार -दीपक बैज यांच्या विधानावर भाजपनेही पलटवार केला आहे. भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले, ""छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे काँग्रेस भयभित आहे. म्हणून अशी विधाने करत आहे. ते म्हणाले, बस्तर भागात एक विसंगतीचे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीच्या नावाने पैसे काढले जात आहेत. याची चौकशी केली जाईल.

प्रशासनाची अॅक्शन - ही बाब लक्षात येताच प्रशासनाने वेबसाइटवरून ही नोंद हटवली आहे. संबंधित लाभार्थ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण बस्तर ब्लॉकच्या तालूर पंचायतीशी संबंधित आहे. यासंदर्भात बस्तरचे जिल्हाधिकारी हरीश एस म्हणाले, माहिती मिळताच संबंधित बँक खाते होल्ड करण्यात आले आहे. योजनेंतर्गत गेलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच, फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

टॅग्स :Sunny Leoniसनी लियोनीChhattisgarhछत्तीसगडGovernmentसरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस