शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

छत्तीसगडमध्ये महिला उमेदवारांचा टक्का कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 05:53 IST

एरवी राजकीय पक्षांकडून महिला सक्षमीकरणाचे व त्यांना समान पातळीवर आणण्याचे मोठमोठे दावे करण्यात येतात. परंतु छत्तीसगड विधानसभेत महिलांची संख्या वाढण्याबाबत सर्वच पक्ष उदासीन दिसत आहेत.

- योगेश पांडेराजनांदगाव : एरवी राजकीय पक्षांकडून महिला सक्षमीकरणाचे व त्यांना समान पातळीवर आणण्याचे मोठमोठे दावे करण्यात येतात. परंतु छत्तीसगड विधानसभेत महिलांची संख्या वाढण्याबाबत सर्वच पक्ष उदासीन दिसत आहेत. दक्षिण छत्तीसगडमध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी शर्यतीत केवळ ६ टक्के महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत.राज्यातील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १२ नोव्हेंबरला आहे. छत्तीसगडमधील ९० पैकी जवळपास ३३ टक्के मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये महिलांची मते निर्णायक ठरू शकतील. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये राजनांदगाव, बस्तर, कोंडागाव, सुकमा, बीजापूर, कांकेर (उत्तर बस्तर) व दंतेवाडा (दक्षिण बस्तर) या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत बस्तर, दंतेवाडा, कांकेर, राजनांदगाव या जिल्ह्यांत महिलांची संख्या पुरुषांपेक्षा वरचढ आहे.असे असूनही सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत हात आखडता घेतला आहे. १८ मतदारसंघांतील १९० उमेदवारांत महिलांची संख्या अवघी १३ इतकी आहे. एकूण उमेदवारांच्या तुलनेत महिलांची टक्केवारी ही फक्त ६.८४ टक्केच आहे.प्रादेशिक पक्षांचेही दुर्लक्षदक्षिण छत्तीसगडमधील १८ जागांवर प्रादेशिक पक्ष व अपक्ष मिळून १२० हून अधिक उमेदवार निवडणूक लढत आहेत. मात्र प्रादेशिक पक्षांनीदेखील स्थानिक महिला नेतृत्व समोर यावे यासाठी पुढाकार घेतलेला नाही.भाजपातर्फे सर्वाधिक चार, काँग्रेसकडून तीन महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. तीनअपक्ष महिला उमेदवार रिंगणात आहेत, तर इतर पक्षांतर्फे केवळ तीन महिलांनाच संधी देण्यात आली आहे.२०१३ च्या तुलनेत दोनच अधिक२०१३ च्या तुलनेत दोनच अधिक

टॅग्स :Electionनिवडणूक