शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला, भाजपा आमदाराचा मृत्यू, तीन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:22 IST

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर असतानाचा नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला आहे.

रायपूर - देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर असतानाचा नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दांतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला घडवून आणला. नक्षलवाद्यांनी ताफ्याला लक्ष्य करून आयईडीद्वारे घडवलेल्या स्फोटात भाजपा आमदार भीमा मंडवी यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जवानांना वीरमरण आले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आमदार भीमा मंडवी हे सभा आटोपून येत असताना त्यांच्या ताफ्याला लक्ष्य करून नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मंडवी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला नक्षलविरोधी ऑपरेशनचे डीआयजी पी. सुंदर राज यांनी दुजोरा दिला आहे. आज संध्याकाळी नक्षलवाद्यांनी एक शक्तिशाली आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात भाजपा आमदार भीमा मांडवी, त्यांचा वाहनचालक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, असे पी. सुंदर राज यांनी सांगितले. 

 

या स्फोटात आमदार मंडवी यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनाची हानी होऊन छत्तीसगड पोलीस दलाचे पाच जवान गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलप्रभावीत दांतेवाडा विभागात 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 

दरम्यान, नक्षलवाद्यांनी आज केलेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. 

 

 काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये  भीषण चकमक उडाली होती. या चकमकीत बीएसएफच्या चार जवानांना वीरमरण आले  होते.  तर अन्य दोन जवान जखमी झाले होते. कांकेरमधील प्रतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महला गाव येथे बीएसएफच्या 114 व्या बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक उडाली होती. 

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाnaxaliteनक्षलवादी