शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

खुलासा! घरी परतला सैनिक तेव्हा पत्नी होती गर्भवती, रागाच्या भरात असं संपवलं दोघांचं जीवन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:58 IST

17 ऑगस्टच्या रात्री पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या करणा-या करणा-या लष्करी जवानाच्या केसमध्ये नवा खुलासा झाला आहे. पत्नीच्या शवविच्छेदन अहवालानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती ही माहिती समोर

ठळक मुद्देपत्नीच्या शवविच्छेदन अहवालानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती होती ही माहिती समोर आली आहे. पत्नी निकिता गर्भवती असल्याचं वृत्त समजल्यापासून तणावात होता.  त्याला निकिताच्या चारित्र्यावर शंका होती, त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता.

जांजगीर , दि. 22 - 17 ऑगस्टच्या रात्री पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या करणा-या करणा-या लष्करी जवानाच्या केसमध्ये नवा खुलासा झाला आहे. पत्नीच्या शवविच्छेदन अहवालानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती होती ही माहिती समोर आली आहे. छत्तीसगड येथील जांजगीर येथील ही घटना आहे.  

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत जवान आकाश चंडेल (वय- 22) हा पत्नी निकिता गर्भवती असल्याचं वृत्त समजल्यापासून तणावात होता.  त्याला निकिताच्या चारित्र्यावर शंका होती, त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता. घटना घडली त्या रात्री दोघांमध्ये या मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आकाशने टेलीफोनच्या वायरच्या सहाय्याने निकिताचा गळा आवळला.  त्यानंतर आकाश  घरातून कार घेऊन निघाला व रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये कार उभी केली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून सुसाट जात असलेल्या मालगाडीसमोर उडी घेऊन त्याने आत्महत्या केली.  

या घटनेमुळे आकाशच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून आकाश आणि निकिता असं काही करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये.  दारूच्या नशेत फिरत होता आकाश- 17 ऑगस्टच्या संध्याकाळी आकाश दारूच्या नशेत बाईकवरून फिरत होता असं गावक-यांनी सांगितलं. घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच निकिता माहेराहून सासरी आली होती तर आकाश 10 दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला होता. आकाश आणि निकितामध्ये झालं होतं भांडण-जवळच्या नातेवाईकांनुसार, दोन-तीन दिवसांपासून आकाश आणि निकितामध्ये कोणत्यातरी कारणावरून खटके उडत होते. मिळाली सुसाइड नोट- आकाशच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली. सुसाइड नोटमध्ये मी आणि माझी पत्नी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत आहोत. आधी मी निकिताचा गळा आवळेल आणि त्यानंतर मी ट्रेन खाली उडी घेऊन आत्महत्या करेल असं आमचं ठरलं आहे. यामध्ये आमच्या कुटुंबाचा काहीच दोष नसून त्यांना दोषी धरलं जाऊ नये.     सुसाइड नोटमध्ये आकाशची मजबुरी-आकाशने पुढे लिहिलंय, मी सैन्यात आहे आणि वर्षभरात मी केवळ 2-3 महिनेच घरी येऊ शकतो , ही माझी मजबुरी आहे. बाबा मला माफ करा आणि भावाला कायमचं घरी बोलावून घ्या. 

टॅग्स :Crimeगुन्हा